आमदार हरिभाऊ बागडे, अशोक चव्‍हाण अन् प्रशांत बंब यांना मराठा तरुणांनी विचारला जाब !

मराठा आरक्षणाच्‍या सूत्रावरून राज्‍यात मराठा समाजातील तरुण हे राजकीय नेत्‍यांना जाब विचारू लागले आहेत. केवळ सत्ताधारीच नाही, तर विरोधक आमदारही यातून सुटले नाहीत.

नांदेड येथे बस पेटवल्‍याने अंतर्गत बससेवा बंद !

मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍याच्‍या मागणीसाठी येथे तीव्र स्‍वरूपात आंदोलन केले जात आहे. येथे एक एस्.टी. बस जाळण्‍यात आली असून दुसर्‍या बसवर दगडफेक करण्‍यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे !

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण चालू होते.

‘आपल्‍याला काय ? बोलून निघून जायचे’ या वक्‍तव्‍याचे मुख्‍यमंत्र्यांकडून स्‍पष्‍टीकरण !

मराठा आरक्षणाविषयीच्‍या पत्रकार परिषदेला व्‍यासपिठावर येत असतांना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे पाहून ‘आपल्‍याला काय ? बोलायचे आणि निघून जायचे.

नांदगाव (जिल्‍हा नाशिक) येथे आरक्षणासाठी धनगर समाजाकडून आमरण उपोषण !

ओबीसींसह धनगर समाजही आरक्षणासाठी रस्‍त्‍यावर उतरला असून अनेक ठिकाणी ‘आमरण उपोषण’ करण्‍यास त्‍यांनी प्रारंभ केला आहे. जिल्‍ह्यातील नांदगाव येथे धनगर समाजाच्‍या वतीने ‘आमरण उपोषण’ चालू झाले आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची सरकारला ३० दिवसांची मुदत !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्‍या आवाहनानंतर मागील १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे; मात्र आहे त्‍या ठिकाणी बसून आंदोलन कायम ठेवण्‍याची भूमिका मनोज जरांने यांनी घेतली आहे.

मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री फडणवीस हे बेईमानी करणार नाहीत, जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवावे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी पुढे म्‍हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते १०० टक्‍के मिळणार आहे. मी आणि माझे सर्व सहकारी या आंदोलनासमवेत आहोत. श्री शिवप्रतिष्‍ठान तुमच्‍या पाठीशी आहे.’’

छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी संघटनांकडून आजपासून अन्‍नत्‍याग आंदोलनाची चेतावणी !

राज्‍यात एकीकडे मराठा आरक्षणाच्‍या सूत्रावरून जालना येथे आंदोलन चालू असतांना दुसरीकडे ओबीसी संघटनाही रस्‍त्‍यावर उतरणार आहेत.

मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण दिल्‍यास तांत्रिकदृष्‍ट्या टिकणार नाही ! – गिरीश महाजन, मंत्री

कुणबी समाज वेगवेगळ्‍या भागांत असून मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्‍यानंतर समाज ‘कुणबी मराठा’ झाला. आता ते मागणी करतात की, संपूर्ण राज्‍यातील मराठा समाजाला ‘कुणबी’ म्‍हणून दाखला द्यावा; मात्र हे कायद्याच्‍या चौकटीत बसणार नाही.

महाराष्‍ट्राचा मणीपूर करायचा नसेल, तर मराठ्यांना आरक्षण द्या !

महाराष्‍ट्र राज्‍य पुष्‍कळ मोठे असून मणीपूर लहान राज्‍य आहे, हे लक्षात ठेवा. सरकारने सर्वपक्षीय बैठकीत मराठ्यांना आरक्षण देण्‍याचा निर्णय घ्‍यावा. अन्‍यथा महाराष्‍ट्राचा मणीपूर झाल्‍याविना रहाणार नाही.