
जालना – ८ सप्टेंबर या दिवशी धनगर समाजाच्या शेखर बंगाळे नामक तरुणाने भाजपचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून धनगर समाजाला आरक्षणाची मागणी केली होती. या वेळी सोलापूर येथील भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्यांना अमानुष मारहाण केली होती. या संदर्भातील व्हिडिओ समाजात प्रसारित झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र होत असतांनाच आता धनगर समाजाचे आंदोलनही तीव्र होत आहे. त्यातच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तोंडाला काळे फासणार्यास ५१ सहस्र रुपयांचे पारितोषिक ‘मल्हार सेने’कडून घोषित करण्यात आले आहे.
या घटनेमुळे धनगर समाजाच्या संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात नरेंद्र काळे यांनी जाहीर क्षमा मागितली आहे. तरीही धनगर समाजातील कार्यकर्ते अद्याप शांत झालेले नाहीत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड तहसील कार्यालयासमोर ‘मल्हार सेने’च्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. धनगर समाजाच्या तरुणास झालेल्या मारहाणीचा निषेध आंदोलकांनी केला आहे, तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्यागपत्राची मागणी मल्हार सेनेने केली आहे.
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !