नंदुरबार येथे सामूहिक शस्त्रपूजन !

मंदिराचे अध्यक्ष अशोक अण्णा चौधरी, सचिव कल्याण पाटील, सैन्य दलातील मेजर अरविंद निकम, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश गिरनार यांच्या हस्ते पार पडले.

कसबा पेठेतील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय !

शनिवारवाडा आणि पाताळेश्वर मंदिराच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास केंद्रशासनाने अटकाव केला आहे. परिसरातील असंख्य नागरिकांना याचा त्रास होत असून आमदार, खासदार आणि नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत.

सोलापूर येथे धर्मप्रेमींनी प्रबोधनाद्वारे देवतांचे विडंबन रोखले !

देवतांचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मप्रेमींचे अभिनंदन !

मालाड येथे धर्मांधांकडून दुर्गादेवीच्या मूर्तीचा अनादर !

वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या धर्मांधांवर पोलीस काय कारवाई करणार ?
हिंदूबहुल राज्यात हिंदूंच्या देवतांचा अनादर होणे संतापजनक !

अजिंठा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष झांबड यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला !

ठेवीदारांच्या अनुमाने ९७.४१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात वर्षभरापूर्वी त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात झांबड हे मुख्य आरोपी आहेत. अद्याप त्यांना अटक झालेली नाही.

हिंदुस्थानच्या पुनरुत्थानासाठी श्री दुर्गामाता दौडीचे राष्ट्रीय नवरात्र ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदुस्थानच्या पुनरुत्थान कार्यात यश संपादन करण्यास शारदीय नवरात्रात श्री दुर्गादेवीचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी श्री दुर्गामाता दौडीचा प्रपंच आईच्या कृपेने करत आहोत.

चिंचवड येथे ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगणारा तरुण गजाआड !

५०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगणार्‍या नीलेश वीरकर या चिंचवडमधील तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. तरुणाकडून २५० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने बनावट नोटा कोठून आणल्या ? यादृष्टीने अन्वेषण चालू आहे.

मुलीच्या आत्महत्येनंतर वडिलांकडून तिला त्रास देणार्‍या आरोपींचा शोध !

आरोपींचा शोध घेण्यासाठी नागरिकांना खस्ता खाव्या लागत असतील, तर पोलीस प्रशासन हवेच कशाला ?

मिरज येथे धर्मांधाने अकारण गायीचे शिंग मोडले !

गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही धर्मांधांकडून गोमातेविषयी होणारी आगळीक अजून किती दिवस सहन करणार ?

मद्यपी चालकाच्या चुकीमुळे कंटेनरची १० दुचाकींना धडक !

‘गुगल मॅप’ने भलताच रस्ता दाखवल्याने अरूंद गल्लीत शिरलेल्या कंटेनरने अनेक दुचाकींना धडक दिली. यामध्ये १० दुचाकींचे अनुमाने ९५ सहस्र ५०० रुपयांची हानी झाली आहे.