राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यामुळे सावेडी येथील लसीकरण केंद्रावर गोंधळ !
भाजपचा युवा नेता आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांमध्ये धक्काबुक्की झाल्याने सावेडी येथील लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाला.
शाळेची फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना त्रास दिल्यास कठोर कारवाई करणार ! – आयुक्त राजेश पाटील
दिलेल्या आदेशाची कार्यवाही खासगी आणि महापालिकेच्या शाळांमध्ये खरेच होत आहे ना, याचा तपास करण्यासाठीही यंत्रणा राबवायला हवी. तरच शुल्काच्या संदर्भातील शाळांचा मनमानी कारभार थांबेल.
शिवाजीराव भोसले बँकेचे पुणे येथील ३ शाखा व्यवस्थापक कह्यात !
वर्ष २००७ मध्ये कर्ज मंजुरी देतांना अनियमितता झाली असून या तिघांनीही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कर्ज मंजूर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना कह्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली.
पुणे येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात पैशासाठी रुग्णाचा मृतदेह अडवला, सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने देयक माफ केले !
रुग्णाच्या नातेवाइकांनी २ लाख ५० सहस्र रुपये जमा केले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३४३ नवीन रुग्ण, तर ३ मृत्यू
आज ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार
पुणे जिल्ह्यात ५ जुलैला बंजरंग दलाची गोवंश हत्या बंदी कायद्याच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ निदर्शने !
पुणे ग्रामीण भागात होत असलेल्या गायी, बैल, वळु चोरी तसेच अवैधरित्या हत्या करण्यासाठी गोवंश वाहतूक सतत चालू आहे. प्रतिदिन सर्रासपणे प्राणी संरक्षण अधिनियम, गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होत आहे.
महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी १० ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे नोंद !
महापालिकेची विविध कामे घेताना बनावट (एफ्.डी.आर्.) कायम ठेव आणि बँक गॅरंटी देऊन महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी १० ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे नोंद केले आहेत.
पांढरकवडा पोलिसांनी वाचवले ४९ गोवंशियांचे प्राण
एका डबल डेकर ट्रकची पडताळणी केली असता ५२ गोवंश कत्तलीसाठी नेतांना कोंबून भरलेले होते. त्यातील ३ गोवंश मृतावस्थेत आढळले.
एम्.पी.एस्.सी. उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील तरुणाची नैराश्यातून आत्महत्या !
फरसुंगी येथील गंगानगर येथे त्याच्या रहात्या घरी घडली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.