
नवी देहली – सर्वाेच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधींच्या फोडाफोडीच्या प्रकरणात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत म्हटले की, ही याचिका अस्पष्ट, सर्वसाधारण आणि बेछूट आरोपांवर आधारित आहे. या आरोपांना पाठिंबा देणारे कोणतेही ठोस साहित्य किंवा पुरावे समोर ठेवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या याचिकेवर विचार करण्याचे कोणतेही कारण नाही.
या याचिकेमुळे अलीकडच्या काळात विविध राज्यांमध्ये झालेल्या राजकीय पक्षांतरांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा चालू झाली होती.
के.के. रमेश नावाच्या याचिकाकर्त्याने ही याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेत राज्यांमधील सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांचे आमदार आणि खासदार यांना पैशांचे आमीष दाखवून, दबाव आणून किंवा इतर मार्गांद्वारे पक्षांतर करण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा करण्यात आला होता. यात न्यायालयाने हस्तक्षेप करून अशा कथित प्रकारांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. याचिकेत कोणत्या राज्यात, कोणत्या नेत्याने किंवा कोणत्या घटनेत कथित अपप्रकार घडले ?, यांविषयी कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नव्हती.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी