हिमाचल प्रदेशातील धार्मिक आणि पर्यटनस्थळे येथील कचरा पाहून परदेशी महिलेचे भारतियांना आवाहन
धर्म आणि संस्कृती यांचा आदर करण्याचेही आवाहन

शिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशाला ‘देवभूमी’ म्हटले जाते. मी तुमचा देश, संस्कृती आणि देवळे यांचा आदर करते; मात्र येथे सर्वत्र दारूच्या बाटल्या आणि कचरा पडलेला पाहून मला फार दुःख झाले. इतक्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणाची अशी अवस्था पहाणे वेदनादायी आहे. ही देवभूमी कचर्याने भरू नका, असे आवाहन एका परदेशी महिला पर्यटकाने एका व्हिडिओद्वारे केले. ही महिला कुठल्या देशाची आहे ?, हे स्पष्ट होऊ शकले नाही. महिलेचा हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.
🚯 "Don't Turn Devbhoomi into a Dumping Ground!"
A viral video shows a foreign tourist urging Indians not to litter religious and tourist sites in Himachal Pradesh. She also appealed to people to respect local culture and traditions.
That a foreign visitor has to remind us of… pic.twitter.com/xXvCJRjWiG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
जंगल परिसराचा व्हिडिओ दाखवत या महिलेने कचर्याच्या ढिगार्यांकडे नागरिकांचे लक्ष वेधले. ‘येथील परिसर आणि दृश्य अतिशय सुंदर आहे; पण सर्वत्र पडलेल्या बाटल्या आणि प्लास्टिक यांमुळे त्याचे सौंदर्य झाकोळले जात आहे. असे करणे थांबवा’, असे ती म्हणाली. पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना उद्देशून ही महिला म्हणाली की, कचरा स्वतःच्या वाहनातच ठेवा. घर, हॉटेल किंवा कचरापेटी मिळाल्यानंतरच कचरा टाका. ‘आपला धर्म आणि संस्कृती यांचा आदर करा’, असे आवाहनही तिने शेवटी हात जोडून केले.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले