(म्हणे) ‘पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देण्यास सज्ज !’ – Bilawal Bhutto Zardari

सिंधु जल करारावरून पाकिस्तानमधील नेते बिलावल भुट्टो झरदारी यांची उघड धमकी

बिलावल भुट्टो झरदारी

इस्लामाबाद (पाकिस्तान ) – भारताने पाकिस्तानचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तान प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे, अशी धमकी ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी संसदेत बोलतांना दिली. पाकिस्तानने सिंधु जल करारावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. भुट्टो पुढे म्हणाले की, नदीच्या पाण्यातील आमच्या अधिकारावर आम्ही तडजोड करणार नाही. त्यासाठी आम्ही लढत राहू.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री झरदारी यांनी सिंधु जल करारावर केलेले हे पहिलेच वक्तव्य नाही. भारताने हा करार स्थगित केल्याची घोषणा केल्यापासून त्यांनी एकापाठोपाठ एक चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. झरदारी यांनी यापूर्वी ‘सिंधु नदीतून एकतर आमचे पाणी वाहील किंवा तुमचा (भारताचा) रक्तपात होईल’, असे वक्तव्य केले होते. झरदारी यांचा पीपीपी हा पक्ष पाकिस्तानमधील सध्याच्या शाहबाज शरीफ सरकारला पाठिंबा देतो.

संपादकीय भूमिका

भारताला धमकी देण्यापेक्षा झरदारी यांनी सरकार आणि आय.एस्.आय. यांना जिहादी आतंकवाद्यांना पोसायचे थांबवण्यास भाग पाडले पाहिजे !