अमेरिकेने ‘यूएस इंडो-पॅसिफिक कमांड’मधून ‘इंडो’ नाव वगळल्याचे प्रकरण

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अमेरिकेने अलीकडेच तिच्या ‘यूएस इंडो-पॅसिफिक कमांड’चे नाव पालटून पुन्हा एकदा जुने नाव, म्हणजेच ‘यूएस पॅसिफिक कमांड’ ठेवण्याचा निर्णय नुकताच घेतला. वर्ष २०१८ मध्ये डॉनल्ड ट्रम्प यांनी भारताचे धोरणात्मक महत्त्व जगासमोर मांडण्यासाठी आणि चीनला शह देण्यासाठी या ‘पॅसिफिक कमांड’ चे नाव पालटून ‘इंडो-पॅसिफिक कमांड’ केले होते.
🇮🇳 Pakistan’s mockery gets a firm reality check!
Kanwal Sibal slammed Hina Rabbani Khar for dismissing the significance of Trump restoring the US Pacific Command name.
The Indo-Pacific framework linked Indian and Pacific Ocean security, countering China’s maritime expansion… pic.twitter.com/G7s41DCk6o
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
अमेरिकने आता ‘इंडो’ हे नाव वगळताच पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांना भारताचा थेट उल्लेख न करता ‘एक्स’ वर एक उपरोधिक पोस्ट लिहिली आहे. हिना म्हणाल्या, ‘‘हे अत्यंत धक्कादायक आहे की, अमेरिकेच्या एका सैनिकी कमांडचे नाव पालटल्याने एखाद्या देशाच्या स्वतःच्या प्रासंगिकतेचे आणि प्रतिष्ठेचे आकलन पूर्णपणे डगमगून जाते. तुमच्या राष्ट्रीय गौरवासाठी ही फारच वाईट आणि लाचार स्थिती आहे.’’
पाकिस्तानच्या या टीकेला भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी चोख प्रत्युत्तर दिले. कंवल सिब्बल म्हणाले, ‘‘हिना रब्बानी खार यांची ही टिपणी ‘भूगोल आणि मुत्सद्देगिरी यांच्या आकलनापलीकडची म्हणजेच अडाण्यासारखी आहे. इंडो-पॅसिफिक हे केवळ एक नाव नसून ती एक पॅसिफिक महासागराची सुरक्षा थेट हिंदी महासागराच्या सुरक्षेशी जोडणारी धोरणात्मक संकल्पना आहे.’’
A highly geopolitically uneducated comment.
The Indo- Pacific concept linked the security of the Pacific Ocean to the Indian Ocean.
Chinese maritime expansionism in the western Pacific and Japan’s concerns underlay this concept.
The Quad provided the structure.
Trump in his… https://t.co/LUgcf18OI1
— Kanwal Sibal (@KanwalSibal) June 17, 2026
या पालटाचे खरे गणित मांडताना सिब्बल यांनी ‘एक्स’वर लिहिले की,
१. ‘‘ट्रम्प यांनी एक मोठा धोरणात्मक संदेश देण्यासाठी ‘यूएस पॅसिफिक कमांड’चे नाव पालटून ‘यूएस इंडो-पॅसिफिक कमांड’ केले होते. आता त्यांनी पुन्हा जुने नाव दिले आहे. यामुळे वैचारिकदृष्ट्या पॅसिफिक महासागराची सुरक्षा हिंदी महासागरापासून वेगळी होते. अशा परिस्थितीत कोणत्याही देशासाठी या पालटामागे दडलेली धोरणात्मक विचारसरणी आणि मुत्सद्दी बुद्धिमत्ता यांचे विश्लेषण करणे अत्यंत स्वाभाविक आहे.
२. चीनने पहिल्या दिवसापासून ‘इंडो-पॅसिफिक’ शब्द, तसेच भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या ‘क्वाड’ संघटनेला कडाडून विरोध केला आहे. चीनचे असे मत आहे की, ही संपूर्ण संकल्पना केवळ त्याला समुद्रात घेरण्यासाठी बनवण्यात आली आहे.
३. पश्चिम पॅसिफिक महासागरात चिनी विस्तारवादाला सामोरे जाण्यासाठी ‘इंडो-पॅसिफिक’ची कल्पना पुढे आली होती. त्याला ‘क्वाड’च्या माध्यमातून एक सशक्त चौकट मिळाली होती.
४. आता जेव्हा अमेरिकेने ‘इंडो’ शब्द काढून टाकला आहे, तेव्हा चीन निश्चितच याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करेल. ‘अमेरिका आता हिंदी महासागराच्या सुरक्षेविषयी तितकी गंभीर नाही’, असे दाखवून आता चीन या संपूर्ण भागात शक्तीचा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न करील.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan