सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ३४३ नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४२ सहस्र ९७९ झाली आहे. दिवसभरात २०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सद्य:स्थितीत ४ सहस्र ९१४ रुग्णांवर उपचार चालू आहेत. गेल्या २४ घंट्यांत ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ७३ झाली आहे. उपचार चालू असलेल्या ४४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार
सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ लसीची पहिली आणि दुसरी मात्रा (डोस) देण्याचे नियोजन ५ जुलै या दिवशी करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण ७ सहस्र ६८० लसी उपलब्ध असतील. या वेळी कोणत्याही परिस्थितीत ४५ वर्षांखालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. दुसरी मात्रा घेणार असलेल्या नागरिकांची सूची संबंधित संस्थांना पाठवण्यात आली आहे. त्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.