जनतेची गैरसोय करणारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी !
नगर – भाजपचा युवा नेता आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांमध्ये धक्काबुक्की झाल्याने सावेडी येथील लसीकरण केंद्रावर ३ जुलै या दिवशी गोंधळ उडाला. भाजपच्या युवा नेत्याने काही कार्यकर्ते आणि आस्थापनातील कामगार लसीकरणासाठी या केंद्रावर आणले होते. या सर्वांना एकाच वेळी लसीकरण केंद्रात आणल्याने गोंधळ झाला म्हणून लसीकरण थांबवण्यात आले. सकाळपासून रांगेत थांबलेल्या नागरिकांनी याविषयी असंतोष व्यक्त केला. याच भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तेथे आल्याने भाजपचा युवा नेता आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाली; मात्र मध्यस्थांमुळे प्रकरण मिटून त्यानंतर लसीकरण चालू झाले.