(आय.एस्.आय. म्हणजे पाकची इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा)
रांची (झारखंड) – रांचीमध्ये रा.स्व. संघाच्या कार्यालयावर झालेल्या पेट्रोल बाँब आक्रमणाच्या प्रकरणी एकूण ३ जणांना अटक करण्यात आली आहे. यांपैकी एक आरोपी रांचीचा रहिवासी आहे, तर २ आरोपी लोहरदगा जिल्ह्यातील आहेत. यातील अमन अन्सारी सीसीटीव्ही चित्रीकरणात पेट्रोल बॉँब फेकत असतांना दिसून आला. अमन दुबईतील कारागृहात असतांना त्याची पाकिस्तानशी संबंधित लोकांशी भेट झाली होती आणि नंतर तो थेट पाकिस्तानी हँडलर्सच्या (भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी नियंत्रण आणि संचालन करणारे लोक) संपर्कात आला होता. शाहजाद भट्टी या आतंकवाद्याच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. भट्टी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी काम करतो. अमन याला कोणत्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि तो कुणाच्या संपर्कात होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
🚨 ISI Link Suspected in Attack on RSS Office in Ranchi
Aman Ansari, accused in the attack on the RSS office in Ranchi, Jharkhand, is suspected to have been in contact with terrorist Shahzad Bhatti, who is believed to be associated with Pakistan's intelligence agency, ISI.
If… pic.twitter.com/cW8yBbZK8a
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2026
१. अन्वेषण यंत्रणा या आक्रमणामागे एका मोठ्या जाळ्याची शक्यता वर्तवत आहेत.
अन्वेषणात असे आढळले की, कार्यालयाबाहेर मिळालेला पेट्रोल बाँब घटनेच्या अगदी काही वेळापूर्वी जुळवण्यात आला होता. आरोपी पेट्रोल बाँब बनवण्यात पूर्णपणे सराईत नव्हत. ते बाँब बनवायला शिकत होते.
२. आरोपींना सामाजिक माध्यमांतून संपर्क करून भरती करण्यात आले होते. आरोपी हे साधारण २० ते २२ वर्षांचे आहेत. तरुणांना कट्टरपंथी जाळ्याद्वारे प्रभावित करण्यात आल्याचा संशय यंत्रणांना आहे. सामाजिक माध्यमांवरील काही संशयास्पद संपर्कांचीही चौकशी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचे अनेक डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.
३. ‘राणा साहेब’ नावाच्या एका कथित हँडलरने आरोपींना पेट्रोल बाँब बनवण्याचा व्हिडिओ पाठवला होता. हा व्हिडिओ पाहूनच आरोपींनी बाँब बनवण्याचा प्रयत्न केला होता. यंत्रणा आता या हँडलरची ओळख आणि ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
आरोपी सैफ याचा पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न

अटक केलेल्या ३ मुख्य आरोपींपैकी सैफ याने पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. १८ जूनच्या सकाळी ११:३० च्या सुमारास सैफ याने प्रसाधनगृहाच्या व्हेंटिलेशन खिडकीची काच फोडून पळून जाण्यात यश मिळवले होते. तो लोहरदगा येथील घरी जाण्यासाठी बसमध्ये बसला होता. पोलीस पथकाने त्याला पकडले आणि रांचीला परत आणत असतांना त्याने पुन्हा एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. सैफने एका पोलीस कर्मचार्याची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांना प्रत्युत्तरादाखल कारवाई करावी लागली. यात सैफच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan