
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकृत जीपमधून येऊन, तसेच पोलीस ओळखपत्र दाखवून केरळम् मधील तरुणांकडून २० लाख रुपये लुटल्याचा प्रकार घडला. या कृत्यामध्ये या विभागाच्या एका पोलीस निरीक्षकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर तो पसार झाला आहे.
In Bengaluru, a CID Police Inspector and his gang of goons have been accused of robbing youth of ₹20 lakhs
The pattern of lawlessness is alarming:
🔹 Dec 2025: Head Constable stole ₹11 Lakh from a suspect in Police HQ.🔹 Nov 2025: Constable arrested in a sensational ₹7.11… https://t.co/Kd8CP2g0s3 pic.twitter.com/bYIdeijVpv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
लुटमारीची घटना बेंगळुरूतील मडिवाळा येथील एका खासगी हॉटेलजवळ घडली. केरळमचे तरुण ‘मनी ट्रेडिंग’ व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन आले होते. ही माहिती समजताच सीआयडीच्या अधिकृत जीपमधून आलेल्या खासगी व्यक्ती आणि पोलीस निरीक्षक यांनी या तरुणांना अडवले. त्यांनी तरुणांना ‘तुम्ही अवैध ‘मनी ट्रेडिंग’साठी पैसे आणले आहेत का ?, असे दरडावत पोलीस ओळखपत्र दाखवले. जीप आणि ओळखपत्र पाहून हे खरे पोलीस आहेत, असे समजून केरळमचे तरुण घाबरले आणि त्यांनी त्यांच्याकडील २० लाख रुपये त्यांच्या स्वाधीन केले.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न