
बेळगाव – कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २० जून या दिवशी पाण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र सरकारकडे २ ‘टी.एम्.सी.’ पाणी सोडण्याकरता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रस्ताव ठेवला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी महंमद रोशन यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘पावसाने अद्यापही समाधानकारक उपस्थिती न लावल्याने बेळगाव शहरासह परिसरात पाणीपुरवठा करणार्या धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोचला आहे. अनेक ठिकाणी मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा चालू असून संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र सरकारकडे २ ‘टी.एम्.सी.’ पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आगामी बैठकीत पाणी समस्येवर तोडगा निघण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.’’
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)