‘रेप गँग इन्क्वायरी रिपोर्ट’मध्ये ब्रिटनमधील वर्षानुवर्षे चालू असलेल्या मुलींवरील अत्याचारांचा खुलासा !
देशाच्या १४९ शहरांत मुसलमानांच्या टोळ्या कार्यरत !

लंडन (ब्रिटन) – देशात वर्षानुवर्षे चालू असलेल्या ‘ग्रूमिंग गँग’च्या (लहान मुली किंवा तरुणी यांना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणारी टोळीच्या) समस्येवर एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. २१९ पानांच्या ‘रेप गँग इन्क्वायरी रिपोर्ट’ या अहवालानुसार ब्रिटनमधील किमान २ लाख ५० सहस्र श्वेतवर्णीय मुलींवर बलात्कार झाला आहे. या अहवालात म्हटले आहे की, देशातील विविध शहरांमध्ये काही संगठित टोळ्या असुरक्षित आणि अल्पवयीन मुलींना लक्ष्य करत होत्या. या टोळ्यांमध्ये ८७ टक्के पाकिस्तानी मुसलमान पुरुष होते आणि त्यांनी प्रामुख्याने ‘श्वेत’ ब्रिटीश मुलींना लक्ष्य केले.
🚨 Shocking findings from the ‘Rape Gang Inquiry Report’!
The report alleges that over 200,000 British girls were abused over several years, with 87% of the accused reportedly being Pakistani Muslim men.
It further claims that grooming gangs operated across 149 cities in the… pic.twitter.com/inU3UDnMAS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
१. अहवालात म्हटले आहे की, मुलींना प्रारंभी मैत्री, प्रेम, भेटवस्तू, दारू, सिगारेट आणि अमली पदार्थ यांच्या आमिषाने जाळ्यात ओढले जात असे.
२. ११ ते १३ वर्षांच्या मुलींना शाळेबाहेरून, निवारा केंद्रांतून आणि रस्त्यावरून टॅक्सीतून नेले जात असे. त्यानंतर त्यांना घरे, सदनिका, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांमध्ये नेऊन अनेक पुरुष मिळून त्यांच्यावर वारंवार बलात्कार करत असत.
३. या अहवालात नमूद केले आहे की, अनेक पीडित मुलींना वेगवेगळ्या शहरांत नेऊन विकले गेले, त्यांचे व्हिडिओ बनवले गेले आणि त्यांना धमकावून सतत दहशतीच्या वातावरणात ठेवले गेले.
४. अहवालानुसार पोलीस, सामाजिक संस्था, शाळा, रुग्णालये आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडे वारंवार धोक्याचे संकेत पोचले होते; परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. अन्वेषणाचा निष्कर्ष असा आहे की, वर्णद्वेषाचा आरोप होण्याची भीती, राजकीय दबाव आणि संस्थात्मक अपयश यांमुळे गुन्हेगारांना अनेक वर्षे मोकळे सोडले गेले. त्यामुळे सहस्रो मुली सतत लैंगिक शोषणाच्या शिकार होत राहिल्या. (मानवतावाद, स्त्रीमुक्ती यांचा ढोल बडवणार्या ब्रिटनमधील सामाजिक स्थिती किती बिघडली आहे, हेच यातून दिसून येते !
५. हा ‘रेप गँग इन्क्वायरी रिपोर्ट’ ब्रिटनमधील ग्रेट यारमाउथचे खासदार रूपर्ट लोव यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र अन्वेषण समितीने सिद्ध केला आहे.
६. अहवालानुसार या टोळ्यांमध्ये सर्वाधिक संख्या पाकिस्तानी मुसलमान पुरुषांची होती. यासह काही प्रकरणांत सोमाली, सीरियन, इराणी आणि तुर्कीये येथील मुसलमान पुरुषांची नावेही समोर आली आहेत. या अहवालात म्हटले आहे की, ‘ग्रूमिंग गँग’मध्ये सहभागी मुसलमान पुरुषांची प्रत्यक्ष संख्या ९५ टक्क्यांपर्यंत असू शकते.
७. ब्रिटनमध्ये वर्ष २००२ च्या सुमारास पहिल्यांदा ‘ग्रूमिंग गँग’शी संबंधित प्रकरणे समोर आली होती. त्यावेळी पाकिस्तानी मूळच्या पुरुषांवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते.
८. अहवालात शिफारस केली आहे की, ‘ग्रूमिंग गँग’शी संबंधित सर्व प्रकरणांची पुन्हा पडताळणी केली जावी आणि जे गुन्हेगार कधीच न्यायालयापर्यंत पोचले नाहीत, त्यांची पुन्हा चौकशी व्हावी. याव्यतिरिक्त पोलीस, सामाजिक सेवा संस्था, शाळा आणि आरोग्य विभाग यांच्या भूमिकेचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !