
पांढरकवडा (यवतमाळ), ४ जुलै (वार्ता.) – पाटणबोरी लगतच्या पिंपळखुटी आर्.टी.ओ. पडताळणी नाक्यावर पांढरकवडा पोलिसांनी सुगाव्याच्या आधारे ४९ गोवंशियांचे प्राण वाचवले. एका डबल डेकर ट्रकची पडताळणी केली असता ५२ गोवंश कत्तलीसाठी नेतांना कोंबून भरलेले होते. त्यातील ३ गोवंश मृतावस्थेत आढळले. या वेळी ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ४९ गोवंशीय गोरक्षकांच्या स्वाधीन करण्यात आले.
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
‘नशामुक्त’ राज्य ?
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक