‘डॉक्टर्स डे’ आणि कृषीदिन यांच्या निमित्ताने कडीपत्ता अन् तुळस यांच्या २०० रोपांचे वाटप !
हे वाटप साहाय्यक वनसंरक्षक दशरथ गोडसे आणि अरुण पाटील, सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ मानसिंग शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
हे वाटप साहाय्यक वनसंरक्षक दशरथ गोडसे आणि अरुण पाटील, सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ मानसिंग शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठा समाजातील युवकांना रहित झालेले आरक्षण पुन्हा मिळावे, या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
याचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी केले होते.
कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दरानुसार राज्यशासनाने जिल्ह्यांना १ ते ५ स्तरात विभागले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्तर ४ प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १२ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी राजे यांचे २५१ किलो वजनाच्या फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे हा हार उचलण्यासाठी जेसीबीचे साहाय्य घेण्यात आले होते, तसेच या वेळी १५० किलो वजनाच्या फुलांची उधळणही करण्यात आली.
पथदिव्यांची वीजदेयके थकल्यामुळे महवितरणने गावोगावी अंधार केला आहे. सरकारने ग्रामपंचायतींच्या विकासकामांच्या निधीतून वीजदेयके देण्याचे अन्याय आदेश काढले आहेत.
सातारा शहर सीमावाढ झाल्यामुळे शाहूपुरी, विलासपूर इतर भागातील विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. या भागांसाठी यापूर्वी ग्रामविकास विभागाने ३ कोटी रुपयांचा निधी संमत केला होता.
कास पठार ते सह्याद्रीनगर हा शिवकालीन मार्ग खुला केल्यास या मार्गावर अनेक अवैध प्रकार चालू होतील.यामुळे हा राजमार्ग बंद आहे, तो तसाच बंद रहावा.
भूमीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्हाटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निपाणी येथील सनातन संस्थेचे साधक श्री. संदीप एकनाथ जाधव यांचे वडील एकनाथ दत्तात्रय जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.