
पनवेल – येथे रेल्वेस्थानक आणि मंगलमूर्ती रोज बाजार परिसरात अनेक फेरीवाले अन् टपरीधारक महापालिकेच्या कोणत्याही अधिकृत परवान्याविना खाद्यपदार्थांची विक्री करत आहेत. त्यांनी पादचारी पथावर अतिक्रमण केल्यामुळे पादचार्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. गटारांमध्ये कचरा आणि घाण टाकली जात असल्याने परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन आणि पनवेल महानगरपालिकेने संयुक्तपणे परिसराची पहाणी करून विनापरवाना विक्री, भेसळयुक्त अन्न आणि अस्वच्छता करणार्यांवर तातडीने कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन ठोस पावले कधी उचलणार ? – संपादक)
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
सांगली येथे भरधाव चारचाकीची अनेक वाहनांना धडक; चालक पसार
नसरापूर प्रकरणी आरोपीने चिमुरडीच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर केले अत्याचार !
कृष्णा नदीपात्रात रासायनिक प्रदूषण नाही ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण