अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वान्स यांचा स्वित्झर्लंड दौरा रहित

वॉशिंग्टन (अमेरिका) – इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या आक्रमणामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात होणारी शांतीचर्चा रखडली. त्यामुळे या चर्चेसाठी स्वित्झर्लंडला जाणारे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वान्स यांनी त्यांचा दौरा रहित केला. अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच झालेल्या शांतता कराराच्या कार्यवाहीसाठी स्वित्झर्लंडमधील बुर्गेनस्टॉक रिसॉर्ट येथे अमेरिका आणि इराण यांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्यांमध्ये बैठक होणार होती. या बैठकीत वान्स इराणी प्रतिनिधींशी चर्चा करून शांतता कराराच्या कार्यवाहीविषयी पुढील आराखडा निश्चित करणार होते. आता ही बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
USA-Iran talks stalled due Israel’s action on Lebanon
U.S. Vice President J.D. Vance's visit to Switzerland cancelled#IranUSPeaceDeal
PC: @StraightArrow__ pic.twitter.com/uYB94obZMM— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 20, 2026
१. ही बैठक रहित झाल्याच्या वृत्ताला स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत दुजोरा दिला आहे.
२. वान्स यांचा नियोजित स्वित्झर्लंड दौरा रहित झाल्यानंतर काही घंट्यांतच दोन्ही देशांतील चर्चेची पुढील फेरी स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
३. ‘अल्-मायादीन’च्या वृत्तानुसार लेबनॉनमध्ये इस्रायलने चालू ठेवलेल्या सैनिकी कारवायांमुळे इराणने तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे. या घडामोडींमुळे अमेरिका-इराण यांच्यातील शांतता प्रक्रियेत तात्पुरता अडथळा निर्माण झाला असून पुढील चर्चेचा दिनांक अद्याप घोषित करण्यात आलेला नाही.
४. चर्चेच्या वेळी इराणने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. इराणची मागणी आहे की, इस्रायलने दक्षिण लेबनॉनवरील आक्रमणे तातडीने थांबवावीत आणि तिथे त्याने कह्यात घेतलेला भूभाग परत करावा.
५. इस्रायलने ही मागणी फेटाळून लावली आहे. ‘इराण समर्थित हिजबुल्ला या शिया आतंकवादी संघटनेमुळे उत्तर इस्रायलला मोठा धोका आहे. त्यामुळे आमचे सैन्य मागे घेणार नाही आणि हिजबुल्लाच्या विरोधात लढण्यासाठी इस्रायली सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य हवे’, अशी इस्रायलची ठाम भूमिका आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman