इराण करारावरून अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींची इस्रायलच्या पंतप्रधानांना समज

वॉशिंग्टन (अमेरिका) – इस्रायलने वास्तवाचे भान ठेवावे आणि इस्रायलच्या सर्वांत मोठ्या मित्रराष्ट्रावर विनाकारण टीका करणे टाळावी, अशा कठोर शब्दांत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वान्स यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना समज दिली. व्हाईट हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता कराराविषयी नेतान्याहू यांनी अप्रसन्नता व्यक्त केली होती. त्यावरून अमेरिकेने इस्रायलचे कान टोचले.
जे.डी. वान्स पुढे म्हणाले, ‘‘जगामध्ये इस्रायल कुणालाही आवडत नाही. अमेरिका हाच त्याचा एकमेव बलाढ्य मित्र उरला आहे. माझे इस्रायलला दोन संदेश आहेत. पहिला म्हणजे सध्याच्या जगात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प हे इस्रायलविषयी सहानुभूती बाळगणारे एकमेव प्रभावी राष्ट्रप्रमुख आहेत. दुसरा म्हणजे इस्रायलने अमेरिकेवर टीका करू नये.’’
‘प्रत्येक समस्येचे ‘लोकांना मारून टाकणे’, हे उत्तर असू शकत नाही !
जे.डी. वान्स यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षामंत्री इतामार बेन ग्विर आणि अर्थमंत्री बेजालेल स्मोट्रचि यांच्या भूमिकेवरही टीका केली. वान्स म्हणाले की, त्यांचा नेमका प्रस्ताव काय आहे? अवघ्या ९० लाख लोकसंख्येच्या देशाच्या (म्हणजे इस्रायलच्या) सुरक्षाविषयीच्या प्रत्येक समस्येचे उत्तर लोकांना मारून टाकणे, हे असू शकत नाही. इराण करारावरून इस्रायलमध्ये अनावश्यक भीती निर्माण केली जात आहे. दीर्घकालीन शांतता आणि राजनैतिक तोडगा, हाच या प्रदेशातील स्थैर्याचा मार्ग आहे.
इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेचे अब्जावधी डॉलरचे साहाय्य
इस्रायलला मिळणार्या अमेरिकी सैनिकी साहाय्याचा उल्लेख करतांना जे.डी. वान्स म्हणाले की, इस्रायलच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणार्या एकूण शस्त्रांस्त्रांपैकी अनुमाने दोन-तृतीयांश शस्त्रे अमेरिकेत बनवली जातात आणि त्यासाठी अमेरिकेच्या करदात्यांचा पैसा खर्च होतो. त्यामुळे अमेरिकेलाच समस्या मानणार्या इस्रायली नेत्यांनी वास्तव समजून घ्यायला हवे. ‘रॉयटर्स’च्या अहवालानुसार अमेरिका इस्रायलला प्रतिवर्षी अनुमाने ४ अब्ज डॉलरचे (अनुमाने ३७ सहस्र ७६० कोटी रुपयांचे) सैनिकी साहाय्य पुरवते.
इराणच्या अणू आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर या करारामुळे कोणताही तोडगा निघालेला नाही, अशी भीती इस्रायली अधिकार्यांनी खासगीत व्यक्त केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी थेट उपराष्ट्रपतींच्या विधानावर भाष्य करणे टाळले असले, तरी ‘इस्रायल अमेरिकेसोबतच्या संबंधांना महत्त्व देतो; परंतु दक्षिण लेबनॉनमधील कारवाई इस्रायल चालूच ठेवेल’, असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman