लोणावळा (पुणे) येथे आंदोलकांनी डेक्कन क्वीन रेल्वे २० मिनिटे रोखली !

लोणावळा रेल्वेस्थानकात पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली डेक्कन क्वीन २० मिनिटे आंदोलकांनी रोखली.या आंदोलनाकडे मावळचे खासदार, मावळचे आमदार आणि माजी आमदार, लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष या सर्वांनी पाठ फिरवली.

मुंबईतील लोकलगाड्यांची गर्दी टाळण्यासाठी टपाल कार्यालयाच्या वेळा पालटणार !

मध्य रेल्वे प्रशासनाने ‘शून्य मृत्यू’ मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबई महानगरातील संस्थांना कार्यालयीन वेळेत पालट करण्याचे आवाहन केले असता सर्वप्रथम मुंबईतील टपाल मुख्यालयाने कामकाजाच्या वेळा पालटण्याचा निर्णय घेतला.

पुणे येथून सुटणार्‍या महत्त्वाच्या गाड्या २५ दिवस रहित !

पुणे  येथून सुटणार्‍या १६ एक्सप्रेस गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रहित करण्यात आल्या आहेत.‘प्रवाशांनी गाडीची चौकशी केल्याविना तिकीट काढू नये’, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

केंद्रीय अन्‍वेषण विभागाच्‍या १२ ठिकाणी धाडी !

केंद्रीय अन्‍वेषण विभागाने मुंबईसह सुरत, अमरेली, नवसारी, बक्‍सर अशा १२ ठिकाणी धाडी घातल्‍या. यात अन्‍वेषण पथकांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्‍ट्रॉनिक पुरावे जप्‍त केले आहेत.

मिरज-सांगली रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल सहापदरी होणार !

मिरज-सांगली रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील उड्डाणपूल सध्या जीर्ण झाल्याने त्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. यात हा पूल धोकादायक असून यावरून जड वाहतूक बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे.

बांगलादेशात दंगलखोरांनी रेल्वेगाडीला लावली आग ! : ५ जणांचा मृत्यू

गोपीबाग भागात ५ जानेवारीच्या रात्री दंगलखोरांनी एका रेल्वेगाडीला लावलेल्या आगीमध्ये ५ जणांना मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.

वर्धा येथे तृतीयपंथीयांच्या वेशातील ६ जणांनी रेल्वेतील १० प्रवाशांना लुटले !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अशा घटना घडतात !

मुंबई ते अयोध्या रेल्वे चालू व्हावी ! – मुख्यमंत्री

मुंबई-अयोध्या रेल्वेगाडी चालू व्हावी, अशी इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ३१ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जालना-मुंबई ही ‘वंदे भारत’ रेल्वे आल्यावर त्यांनी तिचे स्वागत केले.

मुंबई-रतलाम दरम्यान ‘कवच’ रेल्वे सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

विरार-नागदादरम्यान १४३ कि.मी.वर, तसेच मुंबई ते रतलाम दरम्यान ‘कवच’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. रेल्वेगाड्यांची समोरासमोर होणारी टक्कर टाळण्यासाठी स्वदेशी बनावटीची ‘कवच’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

आजपासून जालना-मुंबई ‘वन्दे भारत’ एक्सप्रेस चालू होणार !

मुंबई ते जालना ‘वन्दे भारत’ रेल्वे धावणार आहे. या रेल्वेची चाचणी २८ डिसेंबर या दिवशी पार पडली. ही रेल्वे २८ डिसेंबरच्या पहाटे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर पोचली.