दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे २ मुखवटे ! – अशोक चव्हाण; भारताचे नाव खराब करत आहेत राहुल गांधी ! – गिरीश महाजन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आले. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री…

संपादकीय : भारतद्वेषी राहुल गांधी

काँग्रेस आणि राहुल गांधी हे उघडउघड भारतविरोधी भूमिका घेत असतांना प्रत्येक भारतियाने त्यांना जाब विचारायला हवा !

BJP protests : राहुल गांधी यांच्‍या निवासस्‍थानाच्‍या बाहेर भाजपची निदर्शने

काँग्रेसने १९८४ मध्‍ये शिखांचे हत्‍याकांड घडवून आणले. अशांनी ‘भारता शीख भयग्रस्‍त आहेत’, असे म्‍हणणे म्‍हणजे चोराच्‍या उलट्या बोंबा होय !

Amit Shah : देशविरोधी शक्‍तींमागे उभे राहणे, ही राहुल गांधी यांची सवय ! – अमित शहा

गृहमंत्री अशा व्‍यक्‍तीला कारागृहात का टाकत नाहीत ?

भारताला कमी लेखले जाऊ शकत नाही ! – खासदार शशी थरूर, काँग्रेस

काँग्रेसने नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून ते तेथे विविध भारतविरोधी वक्तव्ये करून भारताला कमी लेखत आहेत, या पार्श्‍वभूमीवर थरूर यांचे वरील वक्तव्य म्हणजे गांधी यांना घरचा अहेर असल्याचे बोलले जात आहे. 

(म्हणे) ‘भारतीय लोकशाही ही इराक आणि सीरिया यांच्यासारखी !’

जर भारतीय लोकशाही इराक आणि सीरिया यांसारखी असती, तर राहुल गांधी असे बोलू धजावले असते का ? अशांना राष्ट्रघातकी घोषित करून अटक झाली पाहिजे !

Production Moved to China : (म्‍हणे) ‘भारतात बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्‍या, तर चीन सातत्‍याने रोजगार वाढवत आहे !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांच्‍यासारख्‍या काँग्रेसी नेत्‍यांना कुठे आणि काय बोलले पाहिजे, याचेही भान नाही. भारतविरोधी कथानक रचण्‍यासाठी ते विदेशी भूमीवर भारताचे शत्रुराष्‍ट्र चीनची स्‍तुती करतात. अशा नेत्‍यांवर राष्‍ट्रद्रोहाचा गुन्‍हा का नोंद केला जाऊ नये ?

Sam Pitroda Defends Rahul Gandhi : (म्‍हणे) ‘राहुल गांधी हे उत्तम रणनीतीकार !’ – सैम पित्रोदा, ‘इंडियन ओव्‍हरसीज काँग्रेस’चे अध्‍यक्ष

राहुल गांधी, हे ‘पप्‍पू’ (कसेही वागणार्‍याला उपहासाने पप्‍पू म्‍हणतात) नाहीत, तर ते एक उत्तम रणनीतीकार आहेत, अशा शब्‍दांत ‘इंडियन ओव्‍हरसीज काँग्रेस’चे (भारतीय विदेशी काँग्रेसचे) अध्‍यक्ष सॅम पित्रोदा यांनी टेक्‍सासमधील एका कार्यक्रमात बोलतांना काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांच्‍यावर स्‍तुतीसुमने उधळली.

(म्हणे) ‘भारताच्या इतिहासात प्रथमच मणीपूर येथे नागरी युद्धाची स्थिती !’ – राहुल गांधी

मणीपूर येथे ही स्थिती कुणामुळे निर्माण झाली आहे ? हिंदु मैतेयी समाजावर तेथे ख्रिस्ती कुकींकडून कशा प्रकारे अत्याचार करण्यात येत आहेत, हेसुद्धा राहुल गांधी सांगतील का ?

Rahul Gandhi : (म्हणे) ‘देशात मुसलमानांवर आक्रमणे चालू असतांना सरकार मूकदर्शक आहे !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांना मुसलमानांची इतकी काळजी आहे, तर ते अशांत असलेल्या मध्य-पूर्व, अफगाणिस्तान, पाकिस्तान आदी इस्लामी देशांत, तसेच मुसलमानांवर अत्याचार होत असलेल्या चीनमध्ये त्यांच्या रक्षणासाठी का जात नाहीत ?