(म्हणे) ‘भारतीय लोकशाही ही इराक आणि सीरिया यांच्यासारखी !’

अमेरिकेत राहुल गांधी यांनी लावला नवा शोध

वॉशिंग्टन (अमेरिका) – लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे त्यांच्या अमेरिकी दौर्‍यात काहीही बरळत आहेत. भारतीय वेळेनुसार १० सप्टेंबरच्या रात्री उशिरा त्यांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील ‘नॅशनल प्रेस क्लब’मध्ये एका कार्यक्रमाला संबोधित केले. या वेळी त्यांनी भारतीय लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची स्थिती आणि भारताची आर्थिक प्रगती यांवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, भारतीय लोकशाही ही अत्यंत कमकुवत झाली आहे. भारतातील लोकशाही इराक आणि सीरिया या देशांसारखी झाली आहे.

राहुल गांधी यांनी तोडलेले अकलेचे तारे !

१. आम्ही वर्ष २०१४ मध्ये अशा राजकीय युगात प्रवेश केला, जो आम्ही यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. ही स्थिती म्हणजे आमच्या लोकशाही रचनेच्या पायावर आक्रमण आहे. (भाजपला सत्तेत बसवून देणार्‍या कोट्यवधी हिंदूंच्या मतांचा हा अवमानच होय ! – संपादक)

२. मी पुन:पुन्हा सांगतो की, आम्हाला आरक्षणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करायची आहे. (‘फोडा आणि राज्य करा’ असे घातक राजकारण करणारी काँग्रेस ! – संपादक)

३. काँग्रेसने १३५ कोटी रुपयांचा कर न भरल्यामुळे पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली. असे असतांनाही आम्ही निवडणूक लढवली. मला माहिती नाही, जिथे असे घडले आहे, तिथे लोकशाही आहे कि नाही ? कदाचित् तुम्हाला माहिती असेल, अशा प्रकारची गोष्ट सीरिया किंवा इराक या देशांत घडते. (स्वत: कायदा धाब्यावर बसवायाचा आणि कायद्याचा बडगा उगारला, तर संपूर्ण व्यवस्थेलाच कलंकित करायचे ! अशा गांधींच्या आता मुसक्याच आवळल्या पाहिजेत ! – संपादक)

गांधी यांनी वादग्रस्त पत्रकारांची घेतली भेट !

१. बांगलादेशी सरकारने ज्या पत्रकाराच्या वृत्तसंकेतस्थळावर बंदी घातली आहे आणि तेथील पोलीस ज्याच्या शोधात आहेत, असा बांगलादेशी पत्रकार मुशफिकुल फजल अन्सारी याची राहुल गांधी यांनी भेट घेतली. संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेनेही पत्रकार म्हणून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये त्याच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला होता.

२. राहुल गांधी यांनी ‘इंटरनॅशनल आर्बिट्रेशन अँड मीडिएशन काऊन्सिल’ या संस्थेच्या संचालिका सरिता पांडे यांचीही भेट घेतली. पांडे या अजित साही यांच्या पत्नी आहेत. हे तेच अजित साही आहेत, ज्यांनी कट्टरतावादी मुसलमान संघटना ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम काऊन्सिल’ची वकिली केली होती. ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’च्या मते, इंडियन अमेरिकन मुस्लिम काऊन्सिलचे बंदी घातलेल्या अनेक आतंकवादी संघटनांशी संबंध आहेत.

संपादकीय भूमिका

  • हा शोध लावल्यामुळे राहुल महाशयांना नोबेल पारितोषिक देणेच शेष आहे. युरोपातील काँग्रेसच्या हस्तकांनी यासाठी आता पुढाकार घेतला पाहिजे !
  • जर भारतीय लोकशाही इराक आणि सीरिया यांसारखी असती, तर राहुल गांधी असे बोलू धजावले असते का ? अशांना राष्ट्रघातकी घोषित करून अटक झाली पाहिजे !