सांगली – भाजपकडून द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. एका धर्माला दुसर्या धर्माशी, एका जातीला दुसर्या जातीशी लढायला लावतात. मणीपूर पाहिले असता भारताच्या इतिहासात प्रथमच नागरी युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. दीड वर्ष लोटले, पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर येथे गेले नाहीत, अशी टीका काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जिल्ह्यातील कडेगाव येथील सभेत केली. राज्याच्या एक दिवसीय दौर्यात असतांना त्यांनी सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे जाऊन काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
संपादकीय भूमिकामणीपूर येथे ही स्थिती कुणामुळे निर्माण झाली आहे ? हिंदु मैतेयी समाजावर तेथे ख्रिस्ती कुकींकडून कशा प्रकारे अत्याचार करण्यात येत आहेत, हेसुद्धा राहुल गांधी सांगतील का ? |