‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सैम पित्रोदा यांची स्तुतीसुमने

टेक्सास (अमेरिका) – राहुल गांधी, हे ‘पप्पू’ (कसेही वागणार्याला उपहासाने पप्पू म्हणतात) नाहीत, तर ते एक उत्तम रणनीतीकार आहेत, अशा शब्दांत ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे (भारतीय विदेशी काँग्रेसचे) अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी टेक्सासमधील एका कार्यक्रमात बोलतांना काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ३ दिवसांच्या अमेरिका दौर्यावर आहेत.
पित्रोदा पुढे म्हणाले, ‘‘राहुल गांधी हे अत्यंत हुशार, शिक्षित आणि उत्तम रणनीतीकार आहेत. त्यांचा कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास आहे. देशातील मोठ-मोठे प्रश्न सोडवणे, हे राहुल गांधींचे ध्येय आहे. त्यांच्याकडे अशी दृष्टी आहे, जिच्यासाठी भाजप कोट्यवधी रुपये खर्च करते. गेल्या १० वर्षांपासून भाजप राहुल गांधी यांच्याविषयी खोटी माहिती पसरवत आहे. माझा राहुल गांधी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. भारताला सध्या तरुण नेते आणि आधुनिक विचारसरणी यांची आवश्यकता आहे. राहुल यांची खरी प्रतिमा आता समोर येत आहे. त्यांच्यात पंतप्रधान बनण्याचे सर्व गुण आहेत.’’ यापूर्वीही पित्रौदा यांनी ‘राहुल गांधी हे त्यांचे वडील राजीव गांधी यांच्यापेक्षाही हुशार आहेत’, असे विधान केले होते.
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !
Keir Starmer resigns : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे त्यागपत्र