गांधीवाद्यांची हिंसा !

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात आली आहे ! जोपर्यंत सत्ता असते, तोपर्यंत स्वतःच्या भ्रष्टाचारावर सहज पांघरूण घालता येते; पण सत्ता ही कुणाच्याही दारी कायमस्वरूपी थांबत नसते आणि सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही, याचा विसर काँग्रेसवाल्यांना पडला आणि आज त्याचीच प्रचीती काँग्रेस घेत आहे !

नागपूर येथे काँग्रेसी नेते शेख हुसैन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुत्र्याप्रमाणे मृत्यू होणार असल्याचे आक्षेपार्ह विधान !

नूपुर शर्मा यांच्या पैगंबर यांच्याविषयीच्या कथित अवमानकारक विधानावरून आकांडतांडव करणारे शेख हुसैन यांच्या विधानावर गप्प का आहेत ?

(म्हणे) ‘मुख्य प्रवाहापासून दूर रहाणे, ही भाजपची वृत्ती !’ – राहुल गांधी

‘भाजपच्या कट्टरतेमुळे जगात भाजपच्या प्रतिमेला हानी पोचली आहे’, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

‘नॅशनल हेराल्ड’ भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या आणि देशभरात जनाधार गमावत चाललेल्या काँग्रेसची राजकीय मृत्यूघंटा जवळ आली असल्याचेच हे द्योतक नव्हे का ?

शत्रूचे प्रवक्ते !

भारताच्या मुळावर जे जे देश उठले आहेत, त्या त्या देशांच्या प्रवक्त्यांची एकप्रकारे भूमिका काँग्रेसी नेटाने पार पाडतांना दिसतात. अशा काँग्रेसने सत्तेत असतांना चीन आणि पाक यांच्या संदर्भात कसे निर्णय घेतले असतील, हे यावरून लक्षात येते. अशा पक्षाचे अस्तित्व देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्याचे राजकीयदृष्ट्या अस्तित्व संपवणे, यातच खरे राष्ट्रहित आहे !

शेजारी देश समृद्ध व्हावेत, अशी चीनची इच्छा !

चीनने शेकडो कोटी रुपयांचे कर्ज देऊन श्रीलंकेचा घात केला. त्यामुळेच त्याचे आर्थिक कंबरडे मोडले. नेपाळ आणि पाकिस्तान ही त्याच मार्गाने जात असतांना अशी अविचारी अन् अपरिपक्व विधाने गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला इतिहासजमा करण्यासाठी पुरेशी आहेत !

काश्मीरला भारतापासून तोडण्याची भूमिका मांडणारे ब्रिटीश राजकारणी जेरेमी कॉर्बिन यांची राहुल गांधी यांनी घेतली भेट !

राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षावर याआधीही पाकिस्तानची भूमिका पुढे रेटण्याचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे असे नेते अन् त्यांचे पक्ष यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी भारतीय जनता आतूर आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

उथळ आणि राष्ट्रविरोधी !

ज्या देशाने भारतावर दीडशे वर्षे राज्य करून, त्याची दुर्दशा करून त्याला गुलाम बनवले; अत्यंत समृद्ध आणि सोन्याचा धूर निघणार्या या देशातील सर्वच क्षेत्रांतील मूळ व्यवस्था उद्ध्वस्त करून त्याला अधोगतीच्या खाईत ढकलले; ज्यांनी भारताची गुरुकुल पद्धत संपवून…

(म्हणे) ‘भाजप देशात ध्रुवीकरणाचे रॉकेल शिंपडत असून ठिणगी टाकल्यावर देश जळायला लागेल !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांचे पणजोबा नेहरू पंतप्रधान असतांना चीनने भारताची सहस्रो चौरस कि.मी. भूमी गिळंकृत केली आणि काँग्रेसने कधीही ती चीनकडून परत मिळवली नाही, याविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत ?

काँग्रेस सर्वांत मोठा जातीयवादी पक्ष ! – काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल

हार्दिक पटेल हेही काही धुतल्या तांदुळासारखे नाहीत. पाटीदार समाजाच्या कथित हक्कांसाठी त्यांनी केलेले हिंसक आंदोलन जनता विसलेली नाही. काँग्रेसमध्ये राजकीय पोळी भाजता आली नाही; म्हणून त्यांनी पक्षत्याग केला आहे, हे जनता ओळखून आहे !