पुणे जिल्ह्यात भरदिवसा ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेवर दरोडा

या भागात अनेक वित्तीय संस्था आणि बँका कार्यरत असून त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उत्तराखंड येथील श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिराचा २१ ऑक्टोबरला उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा

श्री सरस्वती मंदिर, माणा येथे २१ ते २७ ऑक्टोबर २०२१ या काळात श्रीमद्भागवत कथा, प्रवचन, भजन-कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

हत्येसाठी नेण्यात येणार्‍या गोवंशियांची इंदापूर पोलिसांनी केली सुटका; २ धर्मांधांना अटक

हत्या करण्याच्या उद्देशाने २ चारचाकी वाहनांतून १० जर्सी गायी, १ म्हैस, तसेच जर्सी आणि देशी गायीचे प्रत्येकी १ वासरू घेऊन जात असताना इंदापूर पोलिसांनी थेट कारवाई करून वाहनांसह ८ लाख ३५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुणे जिल्ह्यात फ्लू रुग्णांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ !

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ‘इन्फ्लूएंझा’ या विषाणूमुळे होणा‍र्‍या फ्लू आणि फ्लूसदृश विकारांचे प्रमाण वाढले आहे. यासाठीची लस उपलब्ध आहे; मात्र लस घेतल्यावर ताप, अंग दुखणे किंवा हातावर येणारी सूज यांसारख्या दुष्परिणामांची भीती बाळगून अनेक नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत.

लेफ्टनंट कर्नल महिलेचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ब्रिगेडियरवर गुन्हा नोंद !

येथील ‘मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल’मध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी एका ब्रिगेडियरने अनैतिक संबंध ठेवले. त्याने महिलेची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ (चलचित्र) बनवून ते प्रसारित करण्याची धमकी दिल्याने तिने आत्महत्या केली.

इतिहास ही यशाची गाथा आणि अपयशाची कहाणी असते ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

इतिहास ही यशाची गाथा आणि अपयशाची कहाणी असते. इतिहास अभ्यासल्यामुळे काय चूक आणि काय बरोबर हे समजते. त्यामुळे चुकाही अचूकपणे समजून घेतल्या पाहिजेत आणि संशोधन करून इतिहासाची मांडणी केली पाहिजे, अशी अपेक्षा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत परीक्षा केंद्रांवरून गोंधळ !

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या पद भरतीसाठी २४ ऑक्टोबर या दिवशी परीक्षा आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सभागृह (हॉल) तिकिटावर परीक्षेचे केंद्र अन्य जिल्ह्यांतील आले आहे. गडचिरोलीतील उमेदवारांना पुण्याचे, तर पुण्यातील उमेदवारांना नाशिक, जळगाव येथील परीक्षा केंद्र मिळाले आहे.

सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे सिंहगडावर पर्यटकांची गर्दी !

१५, १६ आणि १७ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस सुट्या असल्याने सिंहगड आणि खडकवासला चौपाटी परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. या तीन दिवसांत १ सहस्र ९५३ दुचाकी, १ सहस्र ४०२ चारचाकी, तर ४० खासगी जीप यांमधून अनुमाने १२ सहस्त्रांहून अधिक प्रवासी गडावर गेल्याचा अंदाज आहे.

वाहतूक पोलिसांनी दंड भरायला सांगितल्याने चालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली !

वाहतूक पोलिसाला मारहाण करणे, गाडीवरून फरफटत नेणे इत्यादी घटना काही दिवसांनी घडत आहेत. संबंधितांना कठोर शिक्षा होत नसल्याने पोलिसांचा धाक राहिलेला नाही.

पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जात पडताळणी समितीच्या उपायुक्तांना अटक !

८ लाख रुपयांची मागणी केली