पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जात पडताळणी समितीच्या उपायुक्तांना अटक !

८ लाख रुपयांची मागणी केली

पुणे – वानवडी येथील नितीन ढगे यांच्या निवासस्थानाजवळ जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात १ लाख ९० सहस्र रुपये स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नितीन ढगे या उपायुक्तांना अटक केली. त्यांच्या निवासस्थानाच्या झडतीमध्ये १ कोटी २८ लाख ४९ सहस्र रुपयांच्या मालमत्तांच्या कागदपत्रांसहित २ कोटी ८१ लाख ८९ सहस्र एवढ्या मूल्याची मालमत्ता सापडली आहे. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. (लाचखोरीची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी लाचखोरांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक) सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागात नितीन ढगे हे उपायुक्त, तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आहेत. तक्रारदाराच्या पत्नीने जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज केला होता.