कोंढव्यातील (जिल्हा पुणे) ‘साखळी’ पशूवधगृहावर धाड टाकून १४ गायी आणि ५ टन गोमांस जप्त !

प्रशासन गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही कधी करणार ? – संपादक 

कोंढवा येथील पशूवधगृहांवर कोंढवा पोलिसांनी धाड टाकून त्यामध्ये कत्तलीसाठी आणलेल्या १४ गायी आणि ५ टन गोमांस जप्त केले

पुणे – येथील कोंढवा परिसरातील मीठानगरमधील गल्ली क्र.२४ मधील अवैध   ‘साखळी’ नावाच्या पशूवधगृहांवर कोंढवा पोलिसांनी धाड टाकली. त्यामध्ये कत्तलीसाठी आणलेल्या १४ गायी आणि ५ टन गोमांस जप्त करण्यात आले. धाड टाकताच आरोपी तेथून पसार झाले. या प्रकरणी नट्टू कुरेशी, पप्पू भिसे, मलंग कुरेश, इकबाल कुरेशी, फैजाज कुरेशी आणि असिफ कुरेशी यांच्यासह दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या पशूवधगृहाची माहिती शादाब मुलाणी, निखील दरेकर आणि सचिन शिंत्रे यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. जप्त केलेले गोमांस नष्ट करण्यात आले आहे.