‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेशामधील साधकांना आलेल्या अनुभूती १८ नोव्हेंबर या दिवशी पाहिल्या आज पुढील भाग पाहूया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/855788.html
३. सौ. अर्चना गणोरकर, जबलपूर
३ अ. ‘नागीण’ या विकारामुळे जळजळ आणि वेदना होत असल्याने अंथरुणावरून उठताही न येणे; मात्र ब्रह्मोत्सवाच्या वेळी वातावरणातील चैतन्यामुळे सलग ४ घंटे बसता येणे आणि त्या वेळी एकदाही वेदना न होणे : ‘प.पू. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या ४ दिवस आधी मला कमरेपासून पोटापर्यंत नागीण (हर्पिस व्हायरल इन्फेक्शन) हा विकार झाला होता. त्यामुळे मला जळजळ आणि वेदना होत होत्या. मला अंथरुणावरून उठताही येत नव्हते; मात्र ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासूनच माझे मन प्रसन्न होते. माझ्याकडून प्रार्थनाही होत होती. ब्रह्मोत्सवाच्या वेळी वातावरणात एवढे चैतन्य होते की, मी सलग ४ घंटे बसून सोहळा चांगल्या प्रकारे पाहू शकले. मी सोहळा पहात असतांना मला एकदाही वेदना झाल्या नाहीत. त्यासाठी गुरुदेवांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’
४. सौ. संजना गणोरकर, जबलपूर
अ. ११.५.२०२३ या दिवशी ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहाण्याची पूर्वसिद्धता करतांना मला पुष्कळ आनंद होत होता.
आ. सोहळा चालू झाल्यावर श्री विष्णूचे चित्र दाखवण्यात आले. त्या वेळी ‘श्री विष्णूच्या चरणांमधून पिवळा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.
इ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी ‘रथावर आरूढ झालेल्या तिन्ही मोक्षगुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) दर्शन होणे’, हा अत्यंत सुवर्ण क्षण होता.
ई. तिन्ही मोक्षगुरूंकडून चैतन्य प्रक्षेपित होऊन मला आध्यात्मिक लाभ होऊन आनंदाची अनुभूती येत होती.
उ. प.पू. गुरुदेवांच्या चेहर्यावर सर्व साधकांप्रती असलेला भाव पाहून माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘जणू भगवंतच भक्तांना भेटण्यासाठी आला आहे’, असे मला वाटत होते.’
५. श्री. सुनील गणोरकर (वय ६४ वर्षे), जबलपूर
५ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सवाच्या वेळी चैतन्य मिळणार असल्याने पुष्कळ आनंद होणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव होणार असून त्याचे संगणकीय प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे’, असे समजल्यावर ‘आम्हाला चैतन्य मिळणार आहे’, असे वाटून मला पुष्कळ आनंद होत होता. माझ्या मनात ते क्षण पहाण्याची इच्छा संगणकीय प्रक्षेपण पहाण्याची पूर्वसिद्धता करतांनाच जागृत झाली होती.
५ आ. ‘श्रीहरि श्री लक्ष्मीदेवींच्या समवेत अवतरित होऊन सर्व भक्तांना आशीर्वाद देत आहे आणि हा ब्रह्मोत्सव वैकुंठात होत आहे’, असे वाटणे : ब्रह्मोत्सवाच्या वेळी श्री गुरुदेव आशीर्वाद स्वरूपात दोन्ही हात जोडून साधकांना न्याहाळत असतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘भगवंतच भक्तांना भेटण्यासाठी आला आहे’, असे मला वाटले. ‘श्रीहरिच श्री लक्ष्मीदेवींच्या समवेत अवतरित झाला आहे आणि सर्व भक्तांना आशीर्वाद देत आहे. ब्रह्मोत्सव वैकुंठात होत आहे’, असेच मला वाटत होते.’
६. सौ. मधु सिंघल, ग्वाल्हेर
६ अ. प्रथम प्रयत्नातच चांगले तोरण सिद्ध होणे आणि एक वेगळाच उत्साह वाटणे : ‘ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण ज्या ठिकाणी दाखवण्यात येणार होते, त्या ठिकाणी लावण्यासाठी मला तोरण बनवण्याची सेवा होती. मला सकाळी आंब्याची पाने सहजतेने मिळाली. मी फुले आणण्यासाठी बाहेर गेल्यावर मला ऊन्हाचा काहीच त्रास झाला नाही. मी तोरण करतांनाही कसलीच अडचण आली नाही. माझ्याकडून प्रथम प्रयत्नातच चांगले तोरण सिद्ध झाले. त्या वेळी मला एक वेगळाच उत्साह वाटत होता.
७. सौ. पंकज भदौरिया, भोपाळ
७ अ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी ‘जणू श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ लक्ष्मीदेवी आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ शक्ति स्वरूपात दुर्गादेवी आहेत’, असे जाणवले’ (क्रमश:)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २४.५.२०२३)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/856222.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |