ब्रह्मोत्‍सवाचा रथ सिद्ध करण्‍याची सेवा करतांना श्री. नारायण शिरोडकर, पुणे यांना आलेल्‍या अनुभूती

अ. ‘प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेमुळे मला ब्रह्मोत्‍सवाचा रथ सिद्ध करण्‍याची सेवा मिळाली आणि त्‍यांनीच ती माझ्‍याकडून भावपूर्ण करून घेतली.

आ. मला जागरण करण्‍याची सवय नाही, तरीही गुरुदेवांनी ३ रात्री आणि ४ दिवस माझ्‍याकडून अविरत सेवा करून घेतली. ही सेवा करतांना माझी सतत भावजागृती होत होती.

श्री. नारायण शिरोडकर

इ. रथावरील गरुडदेवतेला रंग लावतांना ‘गरुडदेवता जिवंत आहे आणि ती उडत आहे’, असे मला जाणवले.

ई. रथाची सेवा करतांना प्रत्‍येक साधकाचा ‘हा रथ श्री नारायणाचा आहे’, असा भाव होता.

उ. ही सेवा करतांना मला ‘रथाच्‍या भोवती आणि त्‍या परिसरात नागदेवता फिरत आहे’, असे  क्षणाक्षणाला वाटत होते. माझ्‍या आयुष्‍यातील ही दिव्‍य अनुभूती आहे.

ऊ. आजही मला रथाची आठवण आली की, माझी भावजागृती होते. गुरुदेवांनी ही सेवा माझ्‍याकडून करून घेतली. त्‍यासाठी मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’ (१३.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक