‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेश येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. पुष्पा सावंत, इंदूर
१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या छायाचित्राला मोगर्याची फुले आणून त्यांचा हार घालणे आणि ब्रह्मोत्सवाच्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ मोगर्याची फुले गुरुदेवांच्या चरणांवर अर्पण करत आहेत’, हे पाहून भावजागृती होणे : ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या छायाचित्राला घालण्यासाठी मोगर्याचा हार आणायचा होता. शक्यतो येथे मोगर्याची फुले मिळत नाहीत; पण गुरुदेवांच्या कृपेनेच ती फुले मिळाली आणि मी त्या फुलांचा हार गुरुदेवांच्या छायाचित्राला घालू शकले. ब्रह्मोत्सवाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांवर मोगर्याची फुले अर्पण करत आहेत’, हे पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली.
१ आ.ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या छायाचित्राच्या समोर लावलेल्या गायीच्या तुपाच्या दिव्यातील तूप दुसर्या दिवशीही तेवढेच शेष असणे : ब्रह्मोत्सवाच्या दिवशी मी दुपारी २ वाजता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या छायाचित्राच्या समोर गायीच्या तुपाचा दिवा लावला. तो दिवा दुसर्या दिवशी सकाळपर्यंत तेवत होता आणि आदल्या दिवशी दिवा लावतांना त्यामध्ये जेवढे तूप घातले होते, तेवढेच तूप दुसर्या दिवशीही शेष होते.
१ इ. गुरुदेवांच्या कृपेने अल्प वेळेत रांगोळी काढू शकणे : संगणकीय प्रक्षेपण ज्या ठिकाणी दाखवणार होते, त्या ठिकाणी एका साधिकेला रांगोळी काढण्याची सेवा होती. त्या साधिकेला यायला उशीर झाला. त्यामुळे मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना प्रार्थना करून रांगोळी काढण्याची सेवा चालू केली. त्या वेळी गुरुदेवांच्या कृपेने मी अल्प वेळेत रांगोळी काढू शकले. माझ्याकडे रांगोळीत भरण्यासाठी लागणारा रंग नव्हता; पण गुरुदेवांच्या कृपेने एका साधकाकडून तो रंग मिळाला.
‘ब्रह्मोत्सवाच्या वेळी गुरुदेवांनी मला वेगवेगळ्या अनुभूती देऊन त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि त्यांचे चैतन्य अनुभवायला दिले’, त्याबद्दल मी त्यांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
२. सौ. मातंगी तिवारी, इंदूर
२ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना अपेक्षित असे प्रयत्न झाल्यामुळे हलकेपणा जाणवणे आणि आनंद वाटणे : ‘माझ्या मनात पूर्वी घडलेल्या एका प्रसंगामुळे एका नातेवाइकाविषयी अपेक्षेचे विचार होते. ब्रह्मोत्सव आरंभ होण्यापूर्वी एका साधकाच्या साहाय्याने मला त्या विचारांतून बाहेर पडता आले. त्यानंतर माझे मन निर्मळ होऊन माझ्याकडून गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न झाले. त्यामुळे मला पुष्कळ हलकेपणा जाणवला आणि आनंद मिळाला.
२ आ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी हिमशिखराचे दर्शन होणे आणि ‘कैलास मानस सरोवराच्या ठिकाणीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची रथयात्रा चालू आहे’, असे वाटणे : ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले रथातून मैदानात मार्गक्रमण करत होते. त्या वेळी मला मंडपाच्या ठिकाणी हिमशिखराचे दर्शन होत होते. तेव्हा मला वाटले, ‘जणू कैलास मानस सरोवराच्या ठिकाणीच ही रथयात्रा चालू आहे.’ मला सर्व बाजूंनी बर्फाने आच्छादलेले पर्वत दिसत होते. त्या वेळी मी गुरुदेवांचे विराट रूप अनुभवत होते.
२ इ. रथ मैदानाच्या मध्यभागी आल्यावर सूक्ष्मातून दिसलेले दृश्य : रथ मैदानाच्या मध्यभागी आल्यावर मला सूक्ष्मातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले श्रीमद्बद्रीनारायण स्वरूपात आहेत आणि रथ साक्षात् बद्रीनाथ मंदिरच आहे’, असे दिसत होते. मला जाणवले, ‘वैकुंठातून पुष्पक विमान खाली उतरले आहे.’ मला रथाच्या मागे पर्वत दिसत होते.’
(क्रमश:)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २४.५.२०२३)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/855945.html
|