३५० बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसवणार !

शुद्ध हवा उपलब्ध होण्यासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय !

बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसवण्याची व्यवस्था

मुंबई – मुंबईकरांना शुद्ध हवा उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील ३५० बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका आयआयटीकडून हवा शुद्धीकरणासाठी प्रायोगिक तत्त्वावर ६ यंत्रे मागवणार आहे. सध्या १५० बसगाड्यांवर ही यंत्रे बसवण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘वायू’ या आस्थापनाने सिद्ध केलेले पदपथावरील दिवे ५० ठिकाणी कार्यान्वित केले जाणार असून त्यातही हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात आली आहे. चेंबूर येथील डायमंड गार्डन, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे हे दिवे बसवले जातील.