मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यासाठी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या नेत्यांची चढाओढ !

ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्दू-अरबी आणि फारसी विश्वविद्यालय

१. मायावती सरकारने लक्ष्मणपुरीमध्ये स्वतःची मुसलमान मतपेढी (व्होट बँक) बळकट करणे आणि उर्दू, अरबी अन् फारसी भाषांना वाव करणे, यांसाठी विद्यापीठ उभारले होते. त्याचे नाव ‘माननीय श्री कांशीरामजी ऊर्दू-अरबी फारसी विश्वविद्यालय’, असे होते. अखिलेश सरकारने ते नाव पालटून ‘ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्दू-अरबी आणि फारसी विश्वविद्यालय’, असे नवीन नाव दिले.

२. मायावती सरकारने अरबी-फारसी मदरसा बोर्ड परीक्षांना उत्तरप्रदेश शिक्षण मंडळ, अलाहाबाद यांच्या परीक्षेप्रमाणे समान दर्जा दिला आहे; परंतु हे कार्य राज्यघटनेच्या विरोधातील आहे; कारण घटनेच्या ८ व्या अनुसूचित २२ मान्यताप्राप्त भाषांमध्ये अरबी आणि फारसी भाषांचा समावेश नाही; परंतु कुणीही याविरुद्ध जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट करून ती मान्यता रहित करण्याची मागणीही केली नाही.

(संदर्भ : मासिक ‘वैदिक संसार’, जानेवारी २०१७)