आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेच्या सहाय्यासाठी भारत सरसावला

श्रीलंकेने चीनकडून कर्ज घेतल्यामुळे तो चीनचा बटीक बनला आहे. आता श्रीलंका जर भारताकडे साहाय्य मागत असेल, तर कूटनीतीच्या अंतर्गत भारताने साहाय्य करून त्याला स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करावा ! – संपादक

कोलंबो (श्रीलंका) – सध्या श्रीलंका आर्थिक संकटात सापडला असून तेथे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. आवश्यक वस्तूंची आयात करण्याच्या दृष्टीने श्रीलंकेने भारताकडून १ अब्ज डॉलरचे (७ सहस्र ४०० कोटी रुपयांचे) कर्ज मागितले आहे. यासंदर्भात भारताचे विदेशमंत्री जयशंकर आणि श्रीलंकेचे वित्तमंत्री बासिल राजपक्षे यांच्यात झालेल्या एका बैठकीत भारताने अनेक करारांवर स्वाक्षरी करत सहाय्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत मंत्री जयशंकर यांनी ‘श्रीलंकेच्या कह्यात असलेल्या भारतीय मासेमार्‍यांची लवकरात लवकर सुटका करावी’, अशी मागणी केली, तसेच ‘श्रीलंकेच्या साहाय्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढाकार घेईल’, असे आश्वासनही दिले.