वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले ! – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

जिल्ह्यातील नाणारचा प्रकल्प ५ दिवसांत बारसूला हालवला जातो. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला लागणारी जमीन ५ दिवसांत कुठून मिळाली? आज अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात लुटमार चालू आहे.

मंत्रीमंडळाच्‍या खातेवाटपाचा तिढा कायम, भाजपचे वरिष्‍ठ नेते हस्‍तक्षेप करणार !

राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्‍यासाठी अर्थमंत्रीपदाची मागणी करण्‍यात येत आहे; मात्र भाजप आणि शिवसेना अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्‍यास अनुकूल नसल्‍याचे पुढे आले आहे.

शिवरायांनी नष्‍ट केलेल्‍या वतनदार्‍या शरद पवार यांनी पुन्‍हा चालू केल्‍या ! – सदाभाऊ खोत, अध्‍यक्ष, रयत शिक्षण संस्‍था

वर्ष १९७८ मध्‍ये शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले आणि त्‍यानंतर महाराष्‍ट्राच्‍या राजकारणाला जातीपाती अन् घराणेशाही यांचे वळण मिळाले.

रत्नागिरी जिल्ह्यात ‘मनसे’ची मोहीम

या चिखलात आमचा नेता आणि आमचा पक्ष नाही. त्या सर्वांनी राजकारणाचे वाटोळे केले आहे. म्हणूनच एक वेळेला फक्त मनसेला सत्तेत बसवा. बघा, महाराष्ट्र राज्य कसे प्रगतीपथावर असेल.

राज्‍यातील राजकीय घडामोडींवर पुणेकरांचा ‘एक सही संतापाची’ मोहिमेस प्रचंड प्रतिसाद !

मागील काही मासांमध्‍ये देश आणि राज्‍यात चुकीच्‍या पद्धतीने राजकारण चालू आहे. आपण आज एकाला मतदान केले; पण ४ वर्षांत कोण कोणासह गेले ? हे समजत नसून या राजकीय लोकांनी लोकशाहीची थट्टा केल्‍याचे यातून दिसून येत आहे……

हिंदु राष्‍ट्र सेनेकडून के. चंद्रशेखर राव यांच्‍या फलकावर शाईफेक करत निषेध !

छत्रपती संभाजीनगर येथे बी.आर्.एस्. पक्षाचा पदाधिकारी मौलाना अब्‍दुल याने लुटारू औरंगजेबाचे उदात्तीकरण करत ‘औरंगजेब आमचा आदर्श आहे’,असे संतापजनक विधान केले आहे.

शरद पवार यांच्‍यापासून महाराष्‍ट्रातील राजकारणाच्‍या र्‍हासाला प्रारंभ !

भविष्‍यात हा ‘सैतान’ गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी टीका ‘रयत क्रांती संघटने’चे अध्‍यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्‍यावर केली. खोत हे प्रसिद्धीमाध्‍यमांसमोर बोलत होते.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांच्या सर्व आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांची नोटीस !

दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते, तसेच सर्वाेच्च न्यायालयातही दोन्ही पक्षांकडून याचिका करण्यात आली होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार ही नोटीस अध्यक्षांनी पाठवली आहे.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात गड अतिक्रमणमुक्त ?

गड-दुर्गांच्या संवर्धनाची घोषणा राज्य सरकारने केली आहे; मात्र त्यांचा इतिहास भावी पिढीपुढे आणण्यासाठी पुरातत्व विभाग आणि सरकार यांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षित आहे. गड-दुर्गांचे संवर्धन हा केवळ राजकीय लाभापुरता विषय मर्यादित न ठेवता त्याविषयी आत्मियतेने काम करणे आवश्यक आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्‍ट कालावधीत होणार !

७ जुलै या दिवशी विधीमंडळाच्‍या कामकाज सल्लागार समित्‍यांची बैठक झाली. या वेळी विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी ही घोषणा केली.