
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांना मंत्रीपदांची शपथ देऊन १० दिवस झाले, तरी अद्याप यांपैकी कुणालाही खातेवाटप झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेससाठी देण्यात आलेली खाती मान्य नसल्यामुळेच खातेवाटप लांबणीवर गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खातेवाटपाच्या निर्णयात भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. १२ जुलै या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले. त्यामुळे खातेवाटपाचा निर्णय लवकरच सुटण्याची शक्यता आहे. अजित पवार यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही देहली येथे जाण्याची शक्यता आहे.
Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप कधी होईल? सुनील तटकरेंनी सांगितली तारीखhttps://t.co/3sMk7klS9q@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) July 12, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागील सलग ३ दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक झाली. १२ जुलै या दिवशी सकाळीही फडणवीस यांची अजित पवार यांची बैठक झाली; मात्र अद्याप खातेवाटपाचा निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्यासाठी अर्थमंत्रीपदाची मागणी करण्यात येत आहे; मात्र भाजप आणि शिवसेना अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास अनुकूल नसल्याचे पुढे आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी १३ जुलैच्या सायंकाळपर्यंत खातेवाटप होईल, असे सांगितले. १७ जुलै या दिवशी विधीमंडळाचे अधिवेशन चालू होणार आहे. अधिवेशन चालू होण्यापूर्वी खातेवाटप झाले तरच संबंधित मंत्र्यांना अधिकार्यांना त्याविषयीची माहिती देता येईल. त्यामुळे येत्या १-२ दिवसांत खातेवाटपावर निर्णय घ्यावाच
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त