राजकीय भांडवलासाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालू नये ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

‘देहली येथे निर्भया हत्‍या प्रकरण घडले, त्‍या वेळी कुणाचे राज्‍य होते ?, हे आपण पाहिले नव्‍हते. कुर्ला येथे असेच प्रकरण घडले, तेव्‍हा मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, तेव्‍हा आपण ‘शक्‍ती’ कायदा केला, असे सांगून या प्रकरणी ‘विरोधकांनी राजकारण करू नये’, असे नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.

शासकीय पशू-मत्‍स्‍यव्‍यवसाय विज्ञान विद्यापिठाच्‍या कार्यकारिणीत गोसेवा आयोगाच्‍या प्रतिनिधीची नियुक्‍ती होणार !

२० जुलै या दिवशी महाराष्‍ट्र पशू आणि मत्‍स्‍यव्‍यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियमामध्‍ये सुधारणा करून शासनाने ही नियुक्‍ती घोषित केली.

बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून मोर्चे !

गलादेशचा प्रमुख विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ या पक्षाने या मोर्च्यांचे आयोजन केले होते. विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पार्टी ‘बांगलादेश आवामी लीग’वर भ्रष्टाचार आणि मानवाधिकाराचे हनन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

भाजपविरोधी पक्षांची ‘इंडिया’ नावाने आघाडी !

भाजपविरोधी पक्षांची बैठक १८ जुलै या दिवशी येथे पार पडली. या बैठकीला २६ राजकीय पक्षांचे प्रमुख, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारविरोधात विरोधकांचे आंदोलन !

या आंदोलनात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार समर्थक एकाही आमदाराची उपस्‍थिती नव्‍हती. ‘विरोधी पक्षनेते पदाच्‍या निवडीसाठी काँग्रेसच्‍या नेत्‍यांची बैठक चालू झाली आहे. विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच असेल’, असे बाळासाहेब थोरात यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

अविश्‍वास ठराव प्रविष्‍ट केल्‍यानंतर उपसभापतींना पदावर बसण्‍याचा नैतिक अधिकार नाही ! – अनिल परब, आमदार, ठाकरे गट

विधान परिषदेच्‍या उपसभापती म्‍हणून डॉ. नीलम गोर्‍हे काम पहात आहेत. त्‍यांनी स्‍वत:हून पक्षाचे सदस्‍यत्‍व सोडलेले आहे. १० व्‍या परिशिष्‍टातील कायद्याच्‍या २ ‘अ’ मध्‍ये अपात्रतेची तरतूद आहे. त्‍याअंतर्गत आम्‍ही त्‍यांच्‍या विरोधात अपात्रतेची याचिका प्रविष्‍ट केली आहे.

पाशवी बहुमताच्‍या बळावर विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

महाविकास आघाडीच्‍या सर्व आमदारांनी विधानसभेचे कामकाज स्‍थगित झाल्‍यानंतर राज्‍यपालांची भेट घेतली. राज्‍यपालांनी याविषयी सकारात्‍मक चर्चा केली असून आम्‍ही त्‍यांच्‍या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत, असेही ते म्‍हणाले.

विरोधी पक्षनेत्‍याविना विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ !

अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा देऊन १५ दिवस होऊनही महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्‍याची निवड झालेली नाही. त्‍यामुळे विरोधी पक्षनेत्‍याविनाच विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला.

कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांच्‍यावर फौजदारी खटला प्रविष्‍ट करण्‍याचा न्‍यायालयाचा आदेश !

राज्‍याचे कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांनी वर्ष २०१४ आणि वर्ष २०१९ मध्‍ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्‍या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्‍याचे मान्‍य करत सिल्लोड येथील न्‍यायालयाने त्‍यांच्‍याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्‍याचे आदेश १२ जुलै या दिवशी दिले.

मी तडजोड करणार नाही ! – राज ठाकरे

मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्‍याच्‍या चर्चा चालू असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर वरील विधान राज ठाकरे यांनी केले आहे.