सभागृह कि गोंधळगृह ?

सभागृह बंद पाडण्यासाठी विरोधी पक्ष काही ना काही कारणेच शोधत असतात. अधिवेशन चालू होण्यापूर्वीच ‘सरकारला कोणत्या सूत्रांवरून कोंडीत पकडायचे ?’, ते विरोधकांनी आधीच ठरवलेले असते आणि तसे ते सांगतातही. त्यामुळे अधिवेशन हे ‘सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ?’, असा प्रश्न पडतो !

चित्रीकरणातील कृती प्रशिक्षणाचा भाग नाही ! – एन्.सी.सी.

या घटनेच्‍या तीव्र प्रतिक्रिया ४ ऑगस्‍टला ठाणे येथे उमटल्‍या. राष्‍ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे या राजकीय पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले.

मिरजेत ५ ऑगस्‍टला शरद पोंक्षे राजकीय विश्‍लेषकांची मुलाखत घेणार !

याचे आयोजन ‘श्रीराम सेवा संस्‍थे’च्‍या वतीने करण्‍यात आले असून याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ करून घ्‍यावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

गोवा : लोकप्रतिनिधींच्या विरोधात साडेपाच वर्षांत १३५ गुन्हे नोंद

गेल्या साडेपाच वर्षांत आजी-माजी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंचसदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात हे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. यामधील ५९ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर १६ प्रकरणांचे पोलीस अन्वेषण करत आहेत.

भारतासमवेतचे भक्कम संबंध श्रीलंकेच्या विकासासाठी महत्त्वाचे ! – श्रीलंका

भारतासमवेत भक्कम नाते निर्माण करतांना चीनला दूर ठेवणे आणि श्रीलंकेतील तमिळ हिंदूंचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. श्रीलंकेने त्याविषयी भारताला आश्‍वस्त करून कृती करावी !

श्रीलंकेने तमिळांच्या प्रश्‍नांवर बोलावली सर्वपक्षीय बैठक !

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी देशातील अल्पसंख्य तमिळांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. त्यांनी सर्व पक्षांना या संदर्भातील चर्चेत सहभागी होऊन यावर एकमत निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

…तर विधीमंडळ सभागृहाचे ‘मिडिया हाऊस’ होईल ! – विधानसभा अध्‍यक्ष

सभागृह चालू असतांना जो प्रश्‍न सार्वजनिक हिताचा असेल असेच सूत्र मांडणे अपेक्षित आहे. असे असतांना काही सदस्‍य ४ मासांपूर्वीचेही विषय मांडतात.

चीनच्या परराष्ट्र मंत्रीपदी वांग यी यांची नियुक्ती !

चिनी सरकारने एक मासापासून गायब असलेले त्याचे परराष्ट्रमंत्री किन गैंग यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्याजागी वांग यी यांची मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वांग हे वर्ष २०१३ ते २०२२ या कालावधीतही चीनचे परराष्ट्र मंत्री होते.

‘फास्‍ट टॅग’ असूनही टोलसाठी अमित ठाकरे यांची गाडी थांबवल्‍यामुळे मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांकडून टोलनाक्‍याची तोडफोड !

शिर्डी येथे श्री साईबाबांच्‍या मंदिरात दर्शन घेऊन अमित ठाकरे नाशिक येथे परतत असतांना त्‍यांना येथील टोलनाक्‍यावर अडवण्‍यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट !

या भेटीत इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्या ठिकाणच्या साहाय्य कार्याविषयी पंतप्रधानांना माहिती दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या दुःखद घटनेविषयी पंतप्रधानांनी सहवेदना व्यक्त करत सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले.