कॅनडा हे हिंदुविरोधी कारवायांचे जागतिक मुख्‍यालय !

कॅनडामधील मुख्‍य राष्‍ट्रीय पक्षाचा पहिला शीख नेता आणि खलिस्‍तानला सहानुभूती देण्‍यास बांधील असलेल्‍या नेत्‍याचा उदय होणे, हे कॅनडामधील मुख्‍य प्रवाहातील राजकारणात आतंकवादाचे आगमन होण्‍याचे संकेत आहेत.

पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर ठोस पुराव्यांविना केलेले आरोप दुर्दैवी ! – अमेरिका भारत स्ट्रटेजिक पार्टनरशीप फोरम्

कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप देशांतर्गत राजकारणामुळे प्रेरित आहेत आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ते शीखबहुल पक्षावर अवलंबून आहेत.

संसदेत राजकीय विरोधकांविषयी अवमानकारक विधान करणे, हा गुन्हा नाही ! – सर्वोच्च न्यायलयाचा निर्वाळा

झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार सीता सोरेन यांच्याविरुद्ध ‘मतांच्या बदल्यात लाच’ घेण्याच्या आरोपाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली.

विधानसभा निवडणुकीमध्ये विनामूल्य गोष्टी देण्याच्या घोषणांवर बंदी घालण्याची मागणी !

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासन, मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकार यांना बजावली नोटीस !

पोलीस महासंचालकपदाच्‍या नियुक्‍तीचे ‘ट्‍वीट’ मुनगंटीवार यांच्‍याकडून ‘डिलीट’ !

प्रत्‍यक्षात राज्‍याच्‍या गृहविभागाकडून रश्‍मी शुक्‍ला यांची नियुक्‍ती केल्‍याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्‍याचे लक्षात येताच सुधीर मुनगंटीवार यांनी हे ‘ट्‍वीट’ ‘डिलीट’ केले

पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली भारत वेगाने विकसित होत आहे !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी पुन्हा केले पंतप्रधान मोदींचे कौतुक !

५ नोव्‍हेंबर या दिवशी राज्‍यातील २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुका !

नक्षलवादामुळे निवडणुका लवकर आटोपाव्‍या लागतात. स्‍वातंत्र्यानंतर इतकी वर्षे चाललेल्‍या या परिस्‍थितीमध्‍ये कधी सुधारणा होणार ?

पुण्‍याच्‍या पालकमंत्रीपदी अजित पवार, तर कोल्‍हापूरच्‍या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ !

उच्‍च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर अन् अमरावती, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्‍हापूरचे पालकमंत्रीपद देण्‍यात आले आहे.

(म्हणे) ‘आमचे राजनैतिक अधिकारी भारतात रहाणे कॅनडासाठी महत्त्वाचे !’ – पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

यासाठी कॅनडाने प्रथम त्याच्या देशातील खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताच्या हवाली केले पाहिजे. तसेच तेथील खलिस्तानी चळवळ मोडून काढली पाहिजे. या दोन्ही गोष्टी ट्रुडो करू शकत नसल्याने कॅनडाच्या अधिकार्‍यांची हकालपट्टी आवश्यकच आहे !

‘मी मंत्री सावेंचा पी.ए.’, मर्जीप्रमाणे गुन्‍हा नोंद करा !’

याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मंत्री अतुल सावे म्‍हणाले की, संबंधित व्‍यक्‍ती माझी स्‍वीय साहाय्‍यक नसून केवळ कार्यकर्ता आहे, तसेच पोलिसांना कोणतीही शिवीगाळ झालेली नाही.