जिवंत खेकडा दोरीने बांधून दाखवल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यावर कारवाई करा !

‘पेटा’ची मागणी !

(‘पेटा इंडिया’ म्हणजे पीपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स, इंडिया)

पुणे – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हा ‘खेकडा’ असून तो आरोग्य विभाग पोखरत आहे. तेथे पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशी टीका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये केली. त्या वेळी त्यांनी प्रतिकात्मक म्हणून ‘जिवंत खेकडा’ दोरीने बांधून दाखवला होता. खेकड्याचा चुकीचा वापर केल्याविषयी ‘पेटा इंडिया’ या संस्थेने (पीपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स) आक्षेप घेतला आहे.

यासंदर्भात ‘रोहित पवार यांच्यावर कारवाई करावी’, या मागणीचे पत्र ‘पेटा’ने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना पाठवले आहे. आचारसंहितेचा भंग आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा ‘पेटा इंडिया’चा आक्षेप आहे.