मुंबईत ‘नाइट क्लब’च्या मालकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास संचारबंदी ! -इक्बालसिंह चहल, आयुक्त, महापालिका

मौजमजा करण्याच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात नियम न पाळता एकत्रित आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल.

मुंबई येथे घायाळ युवकाला रुग्णालयात नेण्यास नकार देणार्‍या टॅक्सीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद

३ टॅक्सीचालकांना पोलिसांनी विनंती करूनही त्यांनी घायाळ अवस्थेत पडल्याचे आढळूनही रावत यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला.

एका विवाह सोहळ्यामुळे गोव्यात १०० जण कोरोनाबाधित

गोव्यात एका विवाह सोहळ्यामुळे १०० जण कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन करावे, असे आवाहन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डिन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केले.

राज्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्‍चित

आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी १०० जणांना लस दिली जाईल.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे एकही मृत्यू नाही ; रुग्णसंख्याही घटली

घटत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना केंद्रही बंद होत असून आरोग्य यंत्रणेवरील ताण आता अत्यल्प झाला आहे.

आंध्रप्रदेशच्या एलुरू जिल्ह्यामध्ये अज्ञात आजारामुळे एकाचा मृत्यू, तर २९२ जण आजारी

संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतांना आंध्रप्रदेशच्या एलुरू जिल्ह्यामध्ये एका अज्ञात आजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर २९२ हून अधिक लोक आजारी पडले आहेत.

‘फायझर’ने भारताकडे मागितली कोरोनावरील लसीची विक्री करण्याची अनुमती !

अशी मागणी करणारे ‘फायझर’ हे पहिले औषधनिर्मिती करणारे आस्थापन ठरले आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटीश सरकारने तसेच बहारीनमध्येही ही लस वापरण्यास संमती देण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीस असहकार्य करणार्‍या प्रवाशांवर गुन्हा नोंदवणार ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महानगरपालिका

कोरोनाची चाचणी करण्यास असहकार्य करणार्‍या प्रवाशांवर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे

पत्रकार समीर देशपांडे यांचा कोरोना काळातील कामगिरीविषयी सन्मान

दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीविषयी त्यांचा सन्मान करण्यात आला.