मुंबई – कोरोनाचा धोका अद्याप पूर्णतः संपलेला नसतांनाही शहरात अनेक ठिकाणी असलेल्या ‘नाइट क्लब’कडून सुरक्षित वावराच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. २५ डिसेंबर या दिवशी नाताळ आणि ३१ डिसेंबर या दिवशी नववर्ष स्वागतासाठी ‘नाईट क्लब’कडून मेजवान्या आयोजित होण्याची शक्यता आहे. केवळ मौजमजा करण्याच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात नियम न पाळता एकत्रित आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल, अशी भीती आहे.
२० डिसेंबरपर्यंत ‘नाइट क्लब’च्या मालकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास २० डिसेंबरनंतर मुंबईत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू केली जाईल, अशी चेतावणी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी १० डिसेंबर या दिवशी दिली.