श्रीलंकेत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अग्नीसंस्कार करण्यास मुसलमानांचा पुन्हा विरोध !

  • निसर्ग आणि मनुष्य यांच्या हिताच्या गोष्टींना केवळ धर्माच्या आधारे विरोध करणारे समाजाचे हित काय साधणार ?
  • हिंदु धर्मशास्त्रानुसार मृतदेहावर अग्नीसंस्कार केल्यावर त्यातील सर्व प्रकारचे रोगांचे विषाणू कायमस्वरूपी नष्ट होतात अन् अनिष्ट शक्तींचाही त्रास होत नाही. तसेच अग्नीसंस्कारामुळे जागेचीही बचत होते. याउलट पुरल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या प्रत्येकाच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे हिंदूंसहित, बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या मृतदेहांवर अग्नीसंस्कार केला जात आहे. त्याला आता मुसलमानांकडून पुन्हा विरोध केला जात आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्या १५ मुसलमानांच्या मृतदेहांवर अग्नीसंस्कार करण्यात आला आहे. यात एक २० दिवसांचे अर्भकही होते. त्यामुळे आता या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. यापूर्वी येथील सर्वोच्च न्यायालयातही याविरोधात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती; मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली होती.

१. एप्रिल मासामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर बौद्ध भिक्षुंनीच मागणी केली होती की, कोरोनामुळे मृत पावणार्‍यावर अग्नीसंस्कार केला जातो; कारण मृतदेह पुरल्यावर भूमीतील पाणी संक्रमित होऊन कोरोनाचा संसर्ग आणखी पसरू शकतो, असा दावा करण्यात आला होता.

२. श्रीलंकेतील नागरिकांचा विदेशात मृत्यू झाला, तर काय करायचे, असा प्रश्‍नही येथे उपस्थित झाला आहे. श्रीलंका या मृतदेहांना देशात आणण्यास अनुमती नाकारत आहे. सरकार आता या मृतदेहांना मालदीवमध्ये पुरण्याविषयी तेथील सरकारशी चर्चा करत आहे.