नवी मुंबई येथील बाजार समितीमध्ये १ सहस्र २५१ बाटल्या रक्तसंकलन

उद्धव ठाकरे

नवी मुंबई – राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पाच बाजारांमधील व्यापारी, माथाडी कामगार आणि सुरक्षारक्षक यांनी शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला. त्यामुळे एका दिवसात १ सहस्र २५१ बाटल्या रक्त संकलित झाले आहे.

बाजार समितीचे सभापती अशोक डक, संचालक संजय पानसरे, शंकर पिंगळे, विजय भुत्ता, नीलेश वीरा, अशोक वाळूंज, सचिव अनिल चव्हाण, अतिरिक्त सचिव संदीप देशमुख यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

रक्तदान

राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक नैसर्गिक संकट आणि राष्ट्रीय आपत्ती यांमध्ये बाजार समितीमधील माथाडी, व्यापारी आणि अन्य घटक नेहमीच साहाय्यासाठी पुढे येत असतात. त्यामुळे रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आवाहन केल्यानंतर पाचही बाजारांमध्ये रांगा लागल्या होत्या.