देशात समान नागरी कायदा करा !  

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची संसदेमध्ये केंद्र सरकारकडे मागणी

केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे दुबे यांनी केंद्र सरकारकडे समान नागरी कायदा आणण्यासाठी प्रयत्न करावेत ! – संपादक

भाजपचे खासदार निशिकांत दुबे

नवी देहली – स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण अद्याप समान नागरी कायदा आणू शकलेलो नाही. मी केंद्र सरकारकडे मागणी करतो की, त्याने लवकरच समान नागरी कायद्याच्या संदर्भातील निर्णय घेऊन कायदा संमत करावा, अशी मागणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत केली. ‘भारताच्या एकतेसाठी हा कायदा आवश्यक असून न्यायलयानेही यासंदर्भात निर्देश दिले आहेत’, असेही दुबे यांनी या वेळी म्हटले. दुबे यांनी या वेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचाही आधार घेतला. मागील मासामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कलम ४४ मधील सुधारणांच्या संदर्भात समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. याच कलमामध्ये देशभरातील नागरिकांसाठी सामना कायदा लागू करण्याची तरतूद आहे.