‘पेगॅसस’वरून संसदेत गदारोळ चालूच !

संसद दुपारपर्यंत स्थगित

संसदेचा प्रतिदिन होणारा खर्च गोंधळ घालणार्‍या सदस्यांकडून वसूल करून त्यांना कायमचे निलंबित केले, तरच इतरांना शिस्त लागेल !

नवी देहली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कामकाजाऐवजी गदारोळच अधिक होत असल्याने सातत्याने राज्यसभा आणि लोकसभा यांचे कामकाज स्थगित करावे लागत आहे. ३० जुलैलाही ‘पेगॅसस’ प्रकरणावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत, तर राज्यसभेचे कामकाज प्रथम दुपारी १२ आणि नंतर अडीच वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.