नवी देहली – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संसदेत घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. कासिम, मोनिस आणि शोएब या ३ मुसलमान तरुणांना केंद्रीय सुरक्षादलाच्या सैनिकांनी संसदेच्या संकुलात घुसण्याचा प्रयत्न करतांना अटक केली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
Parliament Security Breach Attempt: Kasim, Monis and Shoaib arrested for trying to infiltrate the Parliament !#CISF #AadharCard #DelhiPolice #ParliamentSecurityBreach pic.twitter.com/CkLp5560ii
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2024
कासिम, मोनिस आणि शोएब यांना नियमित सुरक्षा आणि ओळख चाचणीच्या वेळी प्रवेशद्वारातून संशयास्पदरित्या संसद भवनात घुसतांना अटक करण्यात आली. त्यांची बनावट आधारकार्डे असल्याचे उघड झाले आहे.