Rahul Gandhi’s Parliament Speech : राहुल गांधी यांचे हिंदूंविषयीचे आक्षेपार्ह विधान संसदेच्या कामकाजातून वगळले !

नवी देहली – संसदेच्या कामकाजाच्या सहाव्या दिवशी, म्हणजेच १ जुलैला काँग्रेसचे संसद सदस्य राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. या वेळी त्यांनी हिंदूंना ‘हिंसक’ संबोधल, तसेच त्यांनी सरकारवर अल्पसंख्यांक, ‘नीट’ परीक्षा आणि अग्निपथ योजना या सूत्रांवरून टीका केली. लोकसभेच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार राहुल यांच्या विधानातील काही उतारे संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आली आहेत. याविषयी राहुल गांधी यांना सांगितले असता ते म्हणाले, ‘‘मला जे काही बोलायचे होते, ते मी बोललो. तेच सत्य आहे. तुम्हाला जे काही पुसायचे आहे, तेव पुसून टाका. सत्य हे सत्य असते.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विधानांवर आक्षेप घेतला.