संसदेत बसण्यासाठी पात्र नसलेल्यांना उमेदवारी देणे म्हणजे राष्ट्रहित नव्हे,तर केवळ पक्षहित जोपासणे !

प्रतिकात्मक छायाचित्र

पक्षाचे तिकीट मिळणे, म्हणजेच पक्षाचे अधिकृत उमेदवार बनणे हे पक्षातील मूठभरांच्या हातात असते आणि त्यांच्याकडून होणारी उमेदवारांची निवड वैयक्तिक हेवेदाव्यांच्या आधारे केली जाते. एवढे मोठे मतदारसंघ, तेथील जनतेच्या समस्या, त्यात हे प्रतिनिधी राष्ट्राचे भवितव्य घडवणार्‍या संसदेत बसणार, म्हणजे राष्ट्रासमोरच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास, विचार आणि त्यासाठी आवश्यक भ्रमण अन् या सर्वांसाठी एक मनाने केवळ या महत्त्वाच्या दायित्वासाठीच वेळ देणे आवश्यक आहे. हा वेळ म्हणजे जवळपास पूर्ण वेळच द्यायला हवा. अशा प्रकारचा अनुभव, अभ्यास आणि वेळ काहीही नसलेल्या या मंडळींना ती केवळ निवडून येऊ शकतात म्हणून आणि निवडून आल्यावर शिक्क्याचे काम करतात; म्हणून उमेदवारी देण्यात येते. यात हे पक्ष आणि पक्षातील मूठभर स्वतःचे संकुचित पक्षहित जोपासतात, व्यापक राष्ट्रहित जोपसत नाहीत.

– आनंद हरि