जम्मूमध्ये तिसर्‍यांदा दिसले ड्रोन !

गेले तीन दिवस सलग ड्रोनद्वारे जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतांना सुरक्षायंत्रणा काय करत आहेत ?

बार मालकांकडून वसूल केलेले ३ कोटी १८ लाख रुपये अनिल देशमुख यांनी नागपूर येथील संस्थेच्या नावे वळवले ! – ‘ईडी’ची माहिती

मुंबईतील ‘बार आणि पब’ यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४ कोटी ७० लाख रुपयांपैकी ३ कोटी १८ लाख रुपये देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश याच्या माध्यमातून नागपूर येथील ‘श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट’ या संस्थेत वळवले.

लढाऊ हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करून ड्रोनच्या साहाय्याने बॉम्बस्फोट !

लक्ष्य चुकल्याने लढाऊ विमाने सुरक्षित !

सुधा भारद्वाज यांच्या विरोधात मुदतीत आरोपपत्र प्रविष्ट न केल्याच्या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी !

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सुधा भारद्वाज यांच्या विरोधात मुदतीत आरोपपत्र प्रविष्ट न केल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे.

उत्तरप्रदेशमधील धर्मांतराचा संबंध आतंकवादाशी आणि देशव्यापी असल्याने त्याचे अन्वेषण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवा !

नुकतेच उत्तरप्रदेशातील १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या २ मौलानांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’ या गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा होत असल्याचे चौकशीत पुढे आले,..

‘गूगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध असलेले ‘गजवा-ए-हिंद’ अ‍ॅप विरोधानंतर हटवले गेले !

गूगलला विरोधानंतरच जाग कशी येते ? अशा प्रकारचे अ‍ॅप त्याच्या माध्यमातून लोकांना उपलब्धच होणार नाहीत, याचा विचार गूगल का करत नाही ?

मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १७ जून या दिवशी सकाळी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरावर धाड टाकली. त्यानंतर दुपारी त्यांना अटक करण्यात आली.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून मुंबईतील आणखी २ जणांना अटक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सापडलेल्या ‘जिलेटिन’ कांड्यांच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मालाड येथून आणखी २ जणांना अटक केली आहे.

अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येविषयी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने सत्य लपवून का ठेवले आहे ? – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सचिन सावंत यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत.

देशामध्ये मोठे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचला जात आहे ! – एन्.आय.ए.

अशी माहिती देणारा दूरभाष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ने) आल्याने या प्रकरणी अन्वेषण चालू करण्यात आले आहे. हा दूरभाष बंगालमधील रानाघाट येथून आल्याची माहिती समोर आली आहे.